10/07/2024 विद्यार्थी प्रशिक्षण (Apprenticeship) व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत मॅक येथे चर्चासत्र संपन्न
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या वतीने बुधवार दिनांक १०/०७/२०२४ रोजी बीटीआरआय चे पदाधिकारी, मॅक पदाधिकारी व मान्यवर सभासद यांचे एच.आर.व मॅनेजर यांच्या समवेत विद्यार्थी प्रशिक्षण (Apprenticeship) व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबतच्या चर्चासत्राचे आयोजन मॅक येथील कै.रामप्रताप झंवर सभागृह” येथे करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. एम. आर. बहिरशेठ, कळंबा आयटीआय चे कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार भास्कर घोरपडे, सेंट्रल गव्हरमेंट इम्प्लोमेंट च्या ऑफिसर मेघना वाघ, टाटा स्ट्राईव्ह चे स्वप्नील पाटील या मान्यवरांचा मॅक च्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला.
संजय पेंडसे - मनोगत
स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अध्यक्ष व संचालक, मॅक
संजय पेंडसे साहेब यांनी केंद्र सरकारच्या मार्फत संपन्न झालेल्या स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बदल सविस्तर माहिती दिली व सदर प्रोजेक्ट मध्ये सहभागी झालेल्या कंपन्यांचे विशेष आभार व्यक्त केले. तसेच बीटीआरआय चे पदाधिकारी यांचे देखील विशेष आभार व्यक्त केले.
हरिश्चंद्र धोत्रे - मनोगत
मॅक - अध्यक्ष
हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी सर्वप्रथम केंद्र सरकारच्या मार्फत संपन्न झालेल्या स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बदल बीटीआरआय चे पदाधिकारी, स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अध्यक्ष व संचालक संजय पेंडसे, मान्यवर उद्योजक व संस्थेच्या स्टाफचे विशेष आभार व्यक्त केले. सध्या उद्योजकांना कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्यामुळे संस्थेच्या नूतन इमारतीमध्ये बीटीपी सेंटर लवकरच सुरू करीत असून बीटीपी सेंटर मधून विविध ट्रेड अंतर्गत ट्रेनिंग देऊन मनुष्यबळ पुरवठा करण्यास मदत होईल असे नमूद केले. मॅक चा दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी १७ वा वर्धापन दिन साजरा होत असून सदर वर्धापन दिनानिमित्त महा रक्तदान शिबीर व महा आरोग्य तपासणी शिबीर संस्थेच्या माध्यमातून आयोजित करीत असून सदर रक्तदान व आरोग्य शिबिरामध्ये जास्तीत जास्त उद्योजक व कर्मचारी यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले.
श्री एम आर बहिरशेठ - मनोगत
वरिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार – कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री एम आर बहिरशेठ सर यांनी दरवर्षी 4000 पेक्षा अधिक विद्यार्थी आयटीआय मधून बाहेर पडतात त्यांना अप्रेंटीशीप मिळण्यासाठी कंपन्यांची आवश्यकता असते त्या अनुषंगाने विविध कंपन्यांनी कळंबा आयटीआय येथे रोजगार मेळावा आयोजित करावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अप्रेंटीशीप ची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच सदर उपक्रमासाठी टाटा स्ट्राईव्ह व बी टी आर आय यांची कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सहकार्य करू व येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आयटीआयच्या मुलांना ओजेटी साठी उद्योजकांनी उपलब्धता करून देण्याचे सांगण्यात आले व कळंबा आयटीआय येथे मॅक असोसिएशन मार्फत कौन्सलिंग सेमिनार घेण्यासाठी सांगण्यात आले.
मोहन कुशिरे - मनोगत
मॅक- उपाध्यक्ष
मोहन कुशिरे यांनी अप्रेंटीशीप जागा उद्योजकांच्याकडे उपलब्ध आहेत व आयटीआय ने सहभाग घेऊन त्या संबंधित जागा भरण्यासाठी मार्गदर्शन करावे असे सांगण्यात आले तसेच लवकरात लवकर उद्योजकांना कर्मचारी उपलब्ध व्हावेत या करिता सर्वांनी प्रयत्न करावेत असे नमूद केले.
भास्कर घोरपडे - मनोगत
कनिष्ठ प्रशिक्षणार्थी- कळंबा आयटीआय, कोल्हापूर
भास्कर घोरपडे सर यांनी अप्रेंटीशीप मधून विद्यार्थ्यांना मिळणारे डायरेक्ट बेनिफिट ट्रेनी, डीबीटी मिळवून द्यावी व एम ए पी एस अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला २०२१ नंतर अप्रेंटीशीप पूर्ण केली असेल तर त्याला ४२ हजार रुपये मानधन राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे त्याची मॅक असोसिएशन मार्फत माहिती द्यावी अशी विनंती केली. प्रत्येक तीन महिन्यानंतर असोसिएशनने आयटीआय ला भेट देऊन संबंधित ट्रेड ची ऑन जॉब ट्रेनिंगसाठी प्रयत्न करावेत व ओजेटी दरम्यान मुलांना राहण्यासाठी व कॅन्टीन उपलब्धतेची माहिती उद्योजकाकडून मिळावी व उद्योजक व आयटीआय कॉलेज एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडू असे नमूद केले. फॉन्ड्री ट्रेड करिता मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी त्याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थांना देणे गरजेचे आहे व त्याबाबत जागृती त्यांच्यामध्ये निर्माण करणे करिता प्रयत्न करणे आवश्यक असलेचे नमूद केले. तद्नंतर टाटा स्ट्राईव्ह चे स्वप्नील पाटील यांनी कंपन्या मधील ओ जी टी सुरू करण्याबाबत माहिती देण्यात आली तसेच केंद्र शासन च्या एम्प्लॉयमेंट ऑफिसर मेघना वाघ मॅडम यांनी उद्योजकांना www.ncs.gov.in या संकेतस्थळावरून रिक्त पदांची माहिती अपलोड करावी जेणेकरून उद्योजकांना मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल असे नमूद केले व एम्प्लॉयमेंट ऑफिस च्या माध्यमातून लागणारे सहकार्य नक्कीच करू अशी ग्वाही दिली.
सदर कार्यक्रमामध्ये मॅक च्या वतीने स्ट्राईव्ह प्रोजेक्ट करिता मोलाचे सहकार्य केल्याबद्दल विविध कंपनी मधील एच.आर व मॅनेजर यांचा सत्कार करण्यात आला तसेच मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात १००० रोपांचे वृक्षारोपण केल्याबद्दल मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे विशेष अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले व मॅक च्या वतीने मौर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रतींनिधी यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. एम आर बहिरशेठ, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार भास्कर घोरपडे, एम्प्लॉयमेंट ऑफिसर मेघना वाघ, टाटा स्ट्राईव्ह चे स्वप्नील पाटील, बीटीआर आय चे डंगोरे, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अध्यक्ष व संचालक संजय पेंडसे, ऑन. ट्रेझरर सुरेश क्ष्रीरसागर तसेच विविध कंपनी मधील एच.आर व मॅनेजर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार मॅक चे ऑन. ट्रेझरर सुरेश क्ष्रीरसागर साहेब यांनी मानले.
17/01/2024 रोजी कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथे स्ट्राइव्ह प्रोजेक्ट संदर्भात माहिती देण्यासाठी मॅक कमिटी मधून मा.संजय पेंडसे. स्ट्राइव्ह प्रोजेक्ट. अध्यक्ष. तसेच माननीय शिवाजीराव भोसले.स्वि. संचालक. उपस्थित होते. उद्योजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ आम्ही स्ट्राइव्ह प्रोजेक्ट मधून उद्योजकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांना या प्रोजेक्ट विषयी माहिती पोहोचवावी असे संबोधण्यात आले.
तसेच श्री एस एन अलगुडे.मुख्याध्यापक कोगनोळी हायस्कूल व श्री एस. पी. कुलकर्णी सर व श्री. अमोल आवटे सर व श्री आर ए डोंगरे सर यांनी मॅक असोसिएशनचे आभार व्यक्त केले
कार्यक्रमाच्या शेवटी स्ट्राइव्ह प्रोजेक्ट मॅक असोसिएशन तर्फे सर्व शिक्षक व स्टाफ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
दिनांक 17/1/2024 रोजी कळंबा आय टी आय येथे माननीय भास्कर. रा. घोरपडे. कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार स्ट्राइव्ह प्रोजेक्ट संदर्भात माहिती देण्यासाठी कळंबा आयटीआय येथे आमंत्रित केले होते.त्यावेळी मोटर मेकॅनिक. डिझेल मेकॅनिक. इलेक्ट्रॉनिक्स. या विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना स्ट्राइव्ह प्रोजेक्ट विषयी माहिती सांगण्यात आली.
स्ट्राईव्ह प्रकल्पांतर्गत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब व बिल्डींग कमिटी अध्यक्ष व संचालक संजय जोशी साहेब यांच्या हस्ते चार विद्यार्थ्यांना हमीपत्र देण्यात आले.
कसबा सांगाव ग्रामपंचायत येथे स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत बैठक संपन्न
आज शनिवार दिनांक 25/11/2023 रोजी कसबा सांगाव ग्रामपंचायत च्या सहकार्याने कसबा सांगाव ग्रामपंचायत येथे आयोजित केलेल्या बैठकीत मॅक च्या स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत माहिती देण्याकरिता वेळ देण्यात आली होती.
सदर बैठकीत मॅक स्ट्राईव्ह प्रोजेक्ट कमिटी चे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी सर्वप्रथम कसबा सांगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. यशश्री विक्रमसिंह जाधव, उपसरपंच प्रविण माळी, विक्रमसिंह जाधव, इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्रीकांत कोळी तसेच इतर मान्यवर सदस्य व ग्रामस्थ यांचे स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत माहिती देणे करिता आपण सर्वांनी वेळ दिल्याबद्दल विशेष आभार मानले.
तद्नंतर मॅक स्ट्राईव्ह प्रोजेक्ट कमिटी चे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत सविस्तरपणे माहिती दिली तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी व नोकरीची हमी याबाबत सविस्तर माहिती दिली.
कसबा सांगाव गावातील उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थ बंधू भगिनींना आवाहन केले की १०, १२ पास किंवा नापास तसेच पदवीधर झालेल्या गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपण सदर स्ट्राईव्ह प्रोजेक्ट च्या मोफत शिका व कमवा या योजनेत सहभागी होणेबाबत माहिती द्यावीत व प्रोत्साहन द्यावे व संबंधित असणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपण सदर स्ट्राईव्ह प्रोजेक्टचा लाभ घेणे करीता त्वरीत मॅक ला पाठवावीत अशी मॅक च्या वतीने विनंती केली.
तसेच स्ट्राईव्ह प्रोजेक्टच्या अनुषंगाने एकूण २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची भरती होणार असून ट्रेनिंग,नाव नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे,प्रवास भत्ता व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत असणारी इतर माहिती दिली.
सदर बैठकीस मॅक स्ट्राईव्ह प्रोजेक्ट कमिटी चे अध्यक्ष संजय पेंडसे व इतर स्टाफ उपस्थित राहून स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल कसबा सांगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. यशश्री विक्रमसिंह जाधव मॅडम यांनी आभार मानले.
सदर बैठकीस कसबा सांगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. यशश्री विक्रमसिंह जाधव, उपसरपंच प्रविण माळी, विक्रमसिंह जाधव इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्रीकांत कोळी तसेच इतर मान्यवर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोल्हापूर दक्षिण रोजगार मेळावा
कोल्हापूर दक्षिण रोजगार मेळाव्याची सुरुवात आज दिनांक 5/11/23 रोजी मा. श्री. संजय पाटील साहेब, (President, D. Y. Patil Group), मा. श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब, माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री.ऋतुराज पाटील, आमदार, कोल्हापूर दक्षिण मतदार संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
सदर रोजगार मेळाव्यात मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, Strive Project अध्यक्ष संजय पेंडसे यांनी Strive Project बाबत माहिती दिली.
तद्नंतर मा.श्री. संजय पाटील साहेब,मा.श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांनी तसेच मा.सौ.पूजा ऋतुराज पाटील तसेच स्मॅक,गोशिमा, मॅक पदाधिकारी यांनी मॅक Strive Project स्टॉल ला सदिच्छा भेट दिली व त्या ठिकाणी त्यांना मॅक च्या वतीने Strive Project बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रम प्रसंगी मॅक, केईए स्मॅक, चेंबर, गोशिमा इत्यादी संस्थांचे पदाधिकारी तसेच डी वाय पाटील ग्रुपचे मान्यवर तसेच संयोजक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
यळगुड ग्रामपंचायत येथे स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत बैठक संपन्न
आज सोमवार दि. 06/11/2023 रोजी यळगुड ग्रामपंचायत च्या सहकार्याने यळगुड ग्रामपंचायत येथे मॅक च्या स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत माहिती देण्याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीत मॅक चे ऑन. ट्रेझरर श्री. सुरेश क्षीरसागर यांनी सर्वप्रथम यळगुड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सुजित मोहिते तसेच इतर मान्यवर सदस्य व ग्रामस्थ यांचे स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत माहिती देणे करिता आपण सर्वांनी वेळ दिल्याबद्दल विशेष आभार मानले.
तद्नंतर मॅक चे ऑन. ट्रेझरर श्री. सुरेश क्षीरसागर यांनी स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत सविस्तरपणे माहिती दिली तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी व नोकरीची हमी याबाबत सविस्तर माहिती दिली. यळगुड गावातील उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थ बंधू भगिनींना आवाहन केले की, 10, 12 पास किंवा नापास तसेच पदवीधर झालेल्या गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपण सदर स्ट्राईव्ह प्रोजेक्ट च्या मोफत शिका व कमवा या योजनेत सहभागी होणेबाबत माहिती द्यावीत व प्रोत्साहन द्यावे व आपल्या घरातील अथवा संबंधित असणार्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपण सदर स्ट्राईव्ह प्रोजेक्टचा लाभ घेणे करीता त्वरीत मॅक ला पाठवावीत अशी मॅक च्या वतीने विनंती केली.
तद्नंतर मॅक चे सेक्रेटरी शंतनू गायकवाड यांनी स्ट्राईव्ह प्रोजेक्टच्या अनुषंगाने एकूण 200 विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची भरती होणार असून ट्रेनिंग, नाव नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रवास भत्ता व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत असणारी इतर माहिती दिली.
सदर बैठकीस यळगुड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सुजित मोहिते तसेच ग्रामसेवक, मान्यवर सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.


मराठा समाजास आरक्षण मिळणेबाबत केलेल्या आंदोलनास (मॅक) च्या वतीने जाहीर पाठिंबा
सकल मराठा समाज संघटना यांच्या वतीने दसरा चौक, कोल्हापूर येथे मराठा समाजास आरक्षण मिळणेकरिता सुरू असलेल्या आंदोलनास मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या वतीने जाहीर पाठिंबा असलेबाबतचे पत्र मराठा समाजाचे समन्वयक मा. श्री. वसंतराव मुळीक व त्यांचे सहकारी यांना देताना मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, मॅक चे संचालक यशवंत पाटील व इतर मान्यवर.
मे. आर्या रिटेल्स रोलिंग (इंडिया) प्रा.लि. येथे पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी संपन्न
मे. आर्या रिटेल्स रोलिंग (इंडिया) प्रा.लि. भूखंड नं. बी- ६ येथे कंपनीच्या प्रस्तावित विस्तार प्रकल्प बाबत मा. श्री. संजय तेली, (RDC) मा.श्री. जे.आर.साळुंखे, प्रादेशिक अधिकारी व मा. श्री. प्रमोद माने, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, मे. आर्या रिटेल्स रोलिंग (इंडिया) प्रा. लि. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अलोक बन्सल व इतर तसेच हालसवडे, पट्टण कोडोली, सांगवडेवाडी, हुपरी तळंदगे इत्यादी गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी आज संपन्न झाली. सदर लोकसुनावणी प्रसंगी मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी मे. आर्या रिटेल्स रोलिंग (इंडिया) प्रा. लि यांनी मॅक येथे ऋषिका बन्सल भवन (ईएसआयसी) हॉस्पिटल करिता केलेल्या मदती बद्दल आभार व्यक्त केले तसेच मनुश्यबळ व पर्यावरण विषयक आपले मनोगत व्यक्त केले.
श्री. हरिश्चंद्र धोत्रे -अध्यक्ष, मॅक
NEWS
Strive project
NEWS
Annual General Meeting 2022
Milestones of MAKH