संस्थेचे मुखपत्र फाईव्ह स्टार न्यूज (मासिक) इथे डाऊनलोड करा.
नूतन आमदार मा. श्री. अमल महाडिक साहेब यांचा मॅक च्या वतीने सत्कार संपन्न
आज बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी मा.श्री.अमल महाडिक साहेब यांचा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून नूतन आमदार पदी निवडून आल्याबद्दल मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे साहेब यांच्या हस्ते व ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, मॅक चे संचालक संजय जोशी, संजय पेंडसे, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, निमंत्रित सदस्य सत्यजित सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुके देवून सत्कार व अभिनंदन करण्यात आले. तसेच मॅक च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध समस्याचे निवेदन देण्यात आले व त्यामध्ये खालील विषय मांडण्यात आले.
१. वीज दरवाढ कमी करणे.
२. विदूत पुरवठा उद्योजकांना त्वरीत मिळणेकरिता इन्फ्रास्ट्रक्चर त्वरीत उपलब्ध करून देणे.
३. औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन मोठा इंजिनिअरिंग उद्योग येणे करिता पाठपुरावा करणे.
४. औद्योगिक क्षेत्रात गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन कार्यालकडून पेट्रोलिंग वाढविणे.
वरील सर्व विषयाबाबत मा.श्री.अमल महाडिक साहेब यांच्या समवेत मॅक पदाधिकारी याची सविस्तर चर्चा झाली असून शासन स्तरावरील जे विषय आहेत ते सोडविण्यासाठी मा. मुख्यमंत्री, मा. उद्योगमंत्री यांच्या समवेत लवकरच औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी यांची बैठक आयोजित करू व सहकार्य करू तसेच स्थानिक पातळीवर असणारे विषय सोडविण्यासाठी मी नक्कीच आपणास मदत करेन अशी ग्वाही मा. आमदार अमल महाडीक साहेब यांनी दिली.
मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचा मॅक च्या वतीने सत्कार संपन्न
आज बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी मा.ना.श्री.हसन मुश्रीफ साहेब यांचा *महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री (कॅबिनेट मंत्री) पदी निवड झाल्याबद्दल मॅक च्या वतीने बुके देवून सत्कार व अभिनंदन करताना मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे ,ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, मॅक चे संचालक संजय जोशी, संजय पेंडसे, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, कुमार पाटील, निमंत्रित सदस्य सत्यजित सावंत.

मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा
आज दिनांक २६/१२/२०२४ रोजी रत्नागिरी येथे मा. ना .श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा देताना मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, स्मॅकचे माजी अध्यक्ष व स्मॅक सुवर्ण महोत्सव कमिटी अध्यक्ष सुरेन्द्र जैन व केईए अध्यक्ष बाबासो कोंडेकर.
मा. ना. सौ. पंकजाताई मुंडे, पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री यांच्या समवेत कोल्हापूर मधील विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न.
सर्व प्रथम मा. आमदार श्री. अमल महाडीक साहेब यांनी कोल्हापूर मधील उद्योजकांची ओळख करून दिली व कोल्हापूर मधील उद्योग व्यवसाय बाबत माहिती मा. ना. सौ. पंकजाताई मुंडे यांनी दिली. तद्नंतर महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पदी मा.ना.सौ.पंकजाताई मुंडे निवड झाल्याबद्दल कोल्हापूर मधील विविध औद्योगिक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तद्नंतर औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजकांच्या विविध समस्या खालील प्रमाणे मांडण्यात आल्या.
हरिश्चंद्र धोत्रे -माजी अध्यक्ष व संचालक
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील तसेच इतर औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजकांच्या विविध समस्या खालील प्रमाणे मा. ना. सौ. पंकजाताई मुंडे यांच्या समोर मांडल्या व त्या सोडविण्यासाठी विनंती केली.
१. पाणी बिलात मऔविकास महामंडळाकडून Red व Orange Categories उद्योगांना लावणेत येत असलेला पर्यावरण संरक्षण सेवाशुल्क रद्द करणेत यावा.
२. सर्वच उदयोगामधील तसेच मुख्य चौक व इतर रस्त्यालगत असणारा घनकचरा, द्रव्यकचरा व ई-कचरा गोळा करणेकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून आठवड्यातून एक दिवस कचरा गाडी औद्योगिक क्षेत्रात फिरविण्यात यावी व कचरा संकलन करण्यात यावा.
३.सर्वच औद्योगिक क्षेत्रामधील निघणार्या कचर्याचे एकत्रित संकलन करणेकरिता प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात भूखंड उपलब्ध करून द्यावात जेणेकरून सदर कचर्याचे नियमांनुसार विलगिकरण करून योग्य ते नियोजन करणे सोईस्कर होईल.
४.औद्योगिक क्षेत्रामधील काही फौंड्री उद्योग घटक यांना Orenge Categories मधून Red Categories मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. सदर उद्योग घटकांना पूर्वीच्या Orenge Categories मध्ये समाविष्ट करण्यात यावे.
५.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडे उद्योजकांनी उद्योग घटकाचे Consent to Operate करिता Application केले असता त्यास मंजुरीसाठी मुंबई ऑफिस मुख्यालयाकडे पाठविण्यात येते व त्याकरिता बराच वेळ लागतो त्यामुळे सदर Application ला मंजूरी देणेचे अधिकार स्थानिक प्रादेशिक अधिकारी यांना देणेत यावेत जेणेकरून उद्योजकांचा वेळ वाचेल व उद्योग लवकर सुरू करणे सोईचे होईल.
६.पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात राखीव भूखंडावर शतकोटी वृक्ष लागावड करणेबाबत उद्योजकांना सूचित केले जाते व त्याप्रमाणे उद्योजक व संबंधित कार्यालयाकडून खर्च करून वृक्ष लागवड केली जाते परंतु लावलेली झाडे तोडून तो भूखंड विकला जात आहे त्यामुळे वृक्ष लागवड करतेवेळी योग्य असेल तीच जागा सूचित करण्यात यावी जेणेकरून होणारी वृक्षतोड टळेल.
श्री. स्वरूप कदम - गोशिमा -अध्यक्ष
लघु व मध्यम उद्योजकांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून ज्या उद्योग सुरू करणेकरिता एनओसी लागतात त्या त्वरीत देण्यात याव्यात तसेच उद्योजकांच्या असणार्या फौंड्री क्लस्टरला देखील शासनाकडून लागणारे सहकार्य करावेत अशी विनंती केली.
श्री. भरत जाधव - स्मॅक -उपाध्यक्ष
कोल्हापूर मधील उद्योजकांना लागणार्या सोई सुविधा, असणार्या समस्या ह्या शासनाकडून त्वरीत सोडविण्यात याव्यात जेणेकरून रोजगार निर्मिती वाढेल व उद्योगवाढीसाठी त्याचा नक्कीच उद्योजकांना फायदा होईल असे नमूद केले.
श्री. अरुण गोंदकर व श्री. सतीश बुथडा - सीईटीपी असोसिएशन
कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील टेक्स्टाईल इंडस्ट्रीजशी निगडीत असणार्या सीईटीपी बाबतच्या विविध समस्या मांडण्यात आल्या व त्या सोडविण्यासाठी विनंती करण्यात आली.
मा.ना.सौ.पंकजाताई मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री, वरील सर्व विषयाबाबत सविस्तर माहिती घेवून त्या सोडविण्यासाठी नक्कीच मी संबंधित अधिकारी यांना सूचित करेन तसेच पर्यावरणशी निगडीत असणार्या समस्या देखील नक्कीच सोडवू व उद्योजकांना सहकार्य करू अशी ग्वाही मा. ना. सौ. पंकजाताई मुंडे यांनी दिली.
सदर बैठकीस मा. आमदार श्री. अमल महाडीक, श्री. उमेश देशमुख, प्रादेशिक अधिकारी, श्री. इराप्पा नाईक, मऔवि महामंडळ, श्री. हजारे, प्रादेशिक अधिकारी, मप्रनि मंडळ, मॅक चे माजी अध्यक्ष व संचालक हरिश्चंद्र धोत्रे, गोशिमा अध्यक्ष स्वरूप कदम, स्मॅक उपाध्यक्ष भरत जाधव, मॅक चे ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, स्मक चे ऑन. सेक्रेटरी शेखर कुसाळे, अरुण गोंदकर, सतीश बुथडा, बी.डी. मुतगेकर, सुनिल जाधव आदी मान्यवर उद्योजक उपस्थित होते.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये विना परवाना आयोजित केलेल्या सायकलिंग स्पर्धेमुळे उद्योजक व कामगार बंधूचे मोठे नुकसान
महोदय, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी टेकडी ते हुपरी या मुख्य रस्त्यावरील एक बाजूचा रस्ता बंद करून रविवार दिनांक ०८/१२/२०२४ रोजी सकाळी ७ ते १ या वेळेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाची परवानगी न घेता सायकलिंग स्पर्धेचे आयोजन श्री. उदय पाटील, कोल्हापूर यांच्या टीमच्या वतीने आयोजित केली होती.
सदर स्पर्धेमुळे पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरी व व्यवसायाच्या अनुषंगाने कंपनीमध्ये मान्यवर उद्योजक, कामगार बंधु/भगिनी, माल वाहतूक करणारी ट्रान्सपोर्टची वाहातूक व इतर जाणार्या वाहनांना सकाळी एक बाजूचा रस्ता बंद असल्याने झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे.
पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरी व व्यवसायाच्या अनुषंगाने जवळपास रोज १ लाखा पेक्षा अधिक लोक ये-जा करीत असतात. कंपनीमध्ये कामासाठी येणार्या कामगार बंधू भगिनींना सदरच्या आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे कंपनीमध्ये कामावर वेळेवर पंचिंग करणेकरिता पोहचणे शक्य न झाल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.
सदरच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण हा प्रश्न उद्योजकांच्या व कामगारांच्या समोर उपस्थित झालेला आहे.
सायकलिंग स्पर्धा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये विनापरवाना आयोजित केल्याबद्दल व झालेल्या नुकसानीबद्दल आयोजक व त्यांच्या टीमवरती संबंधित कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई व्हावी अशी सर्व उद्योजक, कामगार बंधू भगिनी व असोसिएशनच्या वतीने मा. उप जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे साहेब यांना मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील साहेब, मऔविकास महामंडळ, कोल्हापूर चे मा. प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत आज गुरुवार दिनांक १२/१२/२०२४ रोजी सर्किट हाऊस , कोल्हापूर येथे निवेदन देवून करण्यात आली.
तसेच येथून पुढील काळात अशा प्रकारच्या कोणत्याही स्पर्धेस औद्योगिक क्षेत्रामध्ये पोलिस मुख्यालय/मऔवि महामंडळ यांनी परवानगी देवू नये अशी विनंती देखील सर्व उद्योजक, कामगार बंधू भगिनी व असोसिएशनच्या वतीने विनंती करण्यात आली.
मा. उप जिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे साहेब यांनी सांगितले की, ज्या आयोजकांनी सदर स्पेर्धेचे आयोजन संबंधित कार्यालयाची परवानगी न घेता केले आहे त्यांच्यावर संबंधित कार्यालयाकडून विना परवाना स्पेर्धेचे आयोजन केल्याबद्दल व झालेल्या नुकसानी बद्दल दंडात्मक कारवाई करणेबाबत सूचित करू तसेच औद्योगिक क्षेत्रात येथून पुढील काळात अशा प्रकारच्या कोणत्याही स्पर्धेस परवानगी देवू नये याबाबत सूचना देवू व दखल घेण्यास सांगू असे नमूद केले.
मा.तबस्सूम जमाल मगदुम, पोलीस निरिक्षक, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विविध विषयाबाबत बैठक संपन्न
महोदय,
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या पोलीस कार्यालयाशी निगडीत असणार्या विविध समस्याबाबत मा.तबस्सूम जमाल मगदुम, पोलीस निरिक्षक, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन, गोकुळ शिरगाव यांच्या समवेत मॅक पदाधिकारी, संचालक मंडळ, सल्लागार व निमंत्रित सदस्य यांची *“कै.रामप्रताप झवर सभागृह” मॅक येथे दिनांक १५/१२/२०२४ रोजी बैठक संपन्न झाली.
सर्व प्रथम मा. तबस्सूम जमाल मगदुम, यांची गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन, गोकुळ शिरगाव च्या पोलीस निरिक्षक, पदी नियुक्ती झाल्याबद्दल मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्वागतपर सत्कार करण्यात आला व पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पोलीस कार्यालयाशी निगडीत असणार्या समस्यांचे निवेदन देण्यात आले.
मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे साहेब व इतर पदाधिकारी यांनी खालील विषयबाबत सविस्तर चर्चा केली व सदर विषय सोडविण्यासाठी विनंती केली.
१. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात यावे व विशेषत: सोमवारी सुट्टी दिवशी मोठ्या प्रमाणात करण्यात यावे.
२. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पोलीस चौकी उभारणीसाठी मिळालेल्या भूखंडावर पोलीस चौकी उभारणीचे काम सुरू झाले असून त्या करिता लागणारा स्टाफ लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावात.
३. एन एच 4-नॅशनल हायवे वरील असणार्या व पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये प्रमुख मार्ग असणार्या लक्ष्मी टेकडी येथे अपघात होऊ नयेत या करिता सकाळी ७ ते १० व सायंकाळी ४ ते ८ ट्राफीक पोलीस यांची नियुक्ती करणेत यावी .
४. मॅक चौक येथे हातगाडी व इतर वाहतूक यांचे मोठया प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे अपघात होत आहेत व वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. सदर ठिकाण चे अतिक्रमण काढणेत यावे तसेच सदर ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लावणेत आले असून त्याबाबत त्वरीत कार्यवाही व्हावी तसेच सदर चौकात सकाळी ७ ते १० व सायंकाळी ४ ते ८ ट्राफीक पोलीस यांची नियुक्ती करणेत यावी.
५. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमण काढणे करिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडून मा. जिल्हापोलिस प्रमुख यांच्याकडे पोलीस बंदोबस्त मिळणे करिता मागणी केली असून पोलीस बंदोबस्त लवकरात लवकर देण्यात यावा व अतिक्रमण हटविण्यात यावे.
६. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मोबाईल, टू व्हीलर गाडी चोरीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी तसेच स्क्रॅप व इतर साहित्य गोळा करणेकरिता येणार्या महिला वर्ग मध्ये चोरी करणेचे प्रमाणे मोठया प्रमाणात दिसून येत असून त्याबाबत देखील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
७. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सुरू असणारे अवैधधंदे बंद करण्यात यावेत.
सदर वरील विषयाच्या अनुषंगाने मा.तबस्सूम मगदुम मॅडम यांनी सांगितले की, चोरीचे प्रमाण कमी करणेकरिता नक्कीच योग्य ती उपाय योजना करून तसेच अतिक्रमण काढणे, ट्राफीक पोलीस नियुक्ती, पेट्रोलिंगमध्ये वाढ करणे, स्टाफ वाढविणे याबाबत देखील दखल घेवू व त्याबाबतची कार्यवाही करू या करिता आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असलेचे नमूद केले. सदर बैठकीचे आभार मॅक चे ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर यांनी मानले.
कळावे,
मोहन कुशिरे,अध्यक्ष,
विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष,
सुरेश क्षीरसागर,ऑन.सेक्रेटरी
अमृतराव यादव,ऑन.ट्रेझरर मॅक
ग्रामपंचायत कर आकारणीबाबत उद्योगभवन येथे बैठक
महोदय, ग्रामपंचायत कर आकारणीबाबत उद्योगभवन, कोल्हापूर येथे बुधवार दिनांक ११/१२/२०२४ रोजी*मा.श्री. इराप्पा नाईक, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे व मॅक चे इतर पदाधिकारी तसेच तळंदगे, कसबा सांगाव, हालसवडे, पट्टणकोडोली, यळगुड व रणदिवेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उप सरपंच,सदस्य व ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.
सदर ग्रामपंचायत कर आकारणीच्या बैठकीत मॅक च्या वतीने खालील मुद्दे मांडण्यात आले असून सदर मुद्यावर सविस्तर चर्चा झाली असून त्याप्रमाणे भूखंड व त्यावरील असणार्या इमारतीची कर आकारणी ग्रामपंचायत मार्फत करणेचे सदर बैठकीत ठरले आहे.
त्याचा आढावा खालील प्रमाणे.
ग्रामपंचायत कर आकारणी मुद्दे
१. मा.उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या समवेत दिनांक १९.३.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत खालील ठरलेल्या मुद्यानुसार सर्व ग्रामपंचायतींनी कर आकारणी करून नवीन बिले देण्याचे ठरले होते त्यानुसार काही ग्रामपंचायतींनी कर आकारणीची बिले बदलून दिली आहेत मात्र अनेक ग्रामपंचायतींनी कर आकारणी बिले बदल करून दिलेली नाहीत त्यांनी ती त्वरीत द्यावीत.
२. सदर नवीन बिले देताना महाराष्ट्र शासन च्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक जी.आर.नुसार पेज नंबर ३६ वरील टीप मुद्दा क्रमांक ४ मध्ये दर्शविल्याप्रमाणे ९.०० मीटर पेक्षा कमी उंचीच्या इंडस्ट्रियल शेडसाठी आर.सी.सी.बांधकाम दराच्या ७५ % दर विचारात घ्यावा व ९.०० मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इंडस्ट्रियल शेडसाठी आर.सी.सी.बांधकाम दराच्या १०० % दर विचारात घ्यावा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून मिळालेल्या बी.सी.सी. (बांधकाम पूर्णत्व दाखला) वरील (Extra Height) वजा करून कर आकारणीची बिले देण्यात यावीत.
३. औद्योगिक क्षेत्रामधील काही उद्योजकांना दोन ग्रापंचायतीच्या कर भरणेबाबत पावत्या आलेल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १२४ (एक) नुसार गावाच्या सिमेतील इमारतीवर कर बसविणेची तरतुद आहे.
त्यानुसार ग्रामपंचायतीने संबंधित मिळकतधारकाकडील जागा / जमीन मालकीचे महसुली पुरावे विचारात घेवून ज्या ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात जमिन आहे त्याच ग्रामपंचायतीने कर आकारणी करावी.
४. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मधील २० नुसार आर्थिक वर्षाचे पहिल्या ६ महिन्यात कर दात्याने संपूर्ण कर भरल्यास मिळकत करामध्ये ५ टक्के सुट देणेची तरतूद आहे. त्याची अमलबजावणी व्हावी व उद्योजकांना मागणी बिले वेळेत द्यावीत जेणेकरून याचा लाभ घेता येईल.
५. महाराष्ट्र शासन च्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक जी.आर.नुसार इमारतीच्या वयोमानानुसार मिळकतीवरील घसारा आकारण्यात यावा.
६. औद्योगिक क्षेत्रात मध्ये मा. जिल्हाधिकारी यांनी सूचित केल्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीने अथवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेकडून औद्योगिक क्षेत्रात आठवड्यातून दोन वेळा घंटागाडीने कचरा उठाव करण्यात यावा.
७. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडून बांधकाम पूर्णत्व दाखला (बी.सी.सी.) प्राप्त झालेपासून कर आकारणी करण्यात यावी.
८. औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजकांना ग्रापंचायतीकडून मागील कर न भरल्यामुळे दंडाची रक्कम आकारण्यात आलेली आहे ती रद्द करण्यात यावी.
वरील सर्व मुद्यावरती सविस्तर चर्चा झाली असून वरील मुद्याच्या अनुषंगाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना मॅक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडून पत्र व्यवहार करणेचे सर्वानुमते ठरले असून सदर वरील मुद्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयाकडून नवीन आकारणी करून उद्योजकांना या पूर्वी दिलेली बिले बदलून द्यावीत असे ठरले .
सदर बैठकीस श्री. इराप्पा नाईक, कार्यकारी अभियंता, श्री. रणजीत बिरंजे, उप अभियंता, मऔविकास महामंडळ, मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, संचालक हरिश्चंद्र धोत्रे, संजय जोशी, यशवंत पाटील, कुमार पाटील, सल्लागार सदस्य गोरख माळी, निमंत्रित सदस्य सत्यजित सावंत तसेच तळंदगे, कसबा सांगाव, हालसवडे, पट्टणकोडोली, यळगुड व रणदिवेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उप सरपंच,सदस्य व ग्रामसेवक, मऔविकास महामंडळ इतर पदाधिकारी, औद्योगिक क्षेत्रातील काही मान्यवर उद्योजक उपस्थित होते.
कळावे,
मोहन कुशिरे, अध्यक्ष
विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष
सुरेश क्षीरसागर, ऑन. सेक्रेटरी
अमृतराव यादव, ऑन. ट्रेझरर, मॅक
मॅक च्या अध्यक्षपदी मोहन कुशिरे व उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची एकमताने निवड
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील असणार्या उद्योजकांच्या उद्योगधंद्याबाबत समस्या जाणून घेणे व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच उद्योजक व कामगार वर्ग यांच्या सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) या संस्थेच्या संचालक मंडळाची ११ वी सभा मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवार दिनांक १०/१०/२०२४ रोजी मॅक येथील “कै.रामप्रताप झवर सभागृह” येथे संपन्न झाली.
सदर संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या सन २०२४-२०२५ या सालाकरिता नूतन पदाधिकारी यांची खालीलप्रमाणे एकमताने निवड करण्यात आली.
मॅक चे नूतन पदाधिकारी
१. अध्यक्षपदी (निवड) - श्री. मोहन रघुनाथ कुशिरे
२. उपाध्यक्षपदी (निवड) – श्री. विठ्ठल ईश्वरा पाटील
३. ऑन. सेक्रेटरी पदी (निवड) – श्री. सुरेश महादेव क्षीरसागर
४. ऑन. ट्रेझरर पदी – (निवड) - श्री. अमृतराव तुकाराम यादव
श्री. मोहन कुशिरे साहेब यांनी सर्व संचालकांनी माझी एकमताने मॅकच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले व अध्यक्षीय कार्यकालामध्ये आपणा सर्वांच्या सहकार्याने विविध उपक्रम उद्योजक व कामगार बंधूंच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्याची ग्वाही दिली. तसेच “संस्थेची भव्य अशी वास्तू उभारणे ,कौशल्य विकास केंद्र सुरू करणे ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत राहू आणि संस्थेच्या माध्यमातून कामगार व उद्योजक यांच्या अडी-अडचणी सोडविणे तसेच मूलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देणेचे काम करू अशी ग्वाही दिली.
तसेच श्री.विठ्ठल पाटील-उपाध्यक्षपदी, श्री.सुरेश क्षीरसागर -मानद सचिवपदी व श्री.अमृतराव यादव - मानद खजानीसपदी, आमची सर्व संचालकांनी एकमताने पदाधिकारी पदी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले व सर्व संचालक यांच्या सहकार्याने विविध उपक्रम उद्योजक व कामगार बंधूंच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्याची ग्वाही दिली.
संस्थेचे मावळते अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी सांगितले की, आपण सर्व संचालकांनी गेल्या दोन वर्षात मला मोलाची साथ दिलीत त्यामुळे मी विविध नियोजित कामे पूर्ण करू शकलो.
माजी अध्यक्ष व संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी,संजय पेंडसे व इतर संचालक यांनी गेल्या दोन वर्षात मॅक चे नाव औद्योगिक क्षेत्रात मोठे झाले असून नावा रूपास येणे करिता हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी अतिशय चांगेल काम केलेचे नमूद केले व धोत्रे साहेब यांचे विशेष आभार मानले व नवीन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
नवीन पदाधिकारी यांनी सर्वांना एकत्रिपणे घेवून संस्थेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असे कामकाज पुढील काळात देखील करून संस्थेच्या कार्यात वाढ होईल अशी ग्वाही दिली.
सदर निवडीप्रसंगी मॅक चे मावळते अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी,संजय पेंडसे, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल व कुमार पाटील आदी मान्यवर उद्योजक उपस्थित होते.
मॅक च्या सर्व संचालकांच्या वतीने नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) ची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल पॅव्हेलियन कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न.
पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल हातकणंगले येथील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) ची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल पॅव्हेलियन कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाली.
मॅकच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रथम स्वागतपर भाषणात मॅकचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र धोत्रे यांनी बोलताना सांगितले की माझ्या अध्यक्षीय कार्यकालामध्ये उद्योजकांच्या असणा-या समस्या सोडविणेसाठी मी नेहमीच प्रयत्न केलेला आहे व करीत राहीन संस्थेच्या माध्यमातून पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्रात काम करणा-या कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सोईकरिता सेवा दवाखाना ईएसआयसी सुरू करण्यात आला आहे त्याचा लाभ कामगार वर्ग व त्यांचे कुटुंबीय घेत आहेत.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मॅकच्या माध्यमातून महा रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी कार्यकम घेण्यात आले तसेच गांधी जयंती निमित्त पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्रात सर्वाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले विद्युत पुरवठा समस्या बाबत संबंधित अधिकारी यांच्या समवेत अनेकवेळा बैठका झाल्या व १० एमव्हीए चा एक नवीन ट्रान्सफॉरमर पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या सोईकरिता बसविण्यात आला. या सर्व कार्यक्रमास उद्योजकांचे मोलाचे सहकार्याबद्दल उद्योजकांचे व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले .
उद्योजकांच्यासाठी अद्ययावत असे मॅक कॅन्टीन सुरू असून त्याचा उपभोग सर्व उद्योजक कामगार बंधू व पर्यटक घेत आहेत तसेच उद्योजकांना चालू घडामोडी व उद्योगांशी निगडीत असणारी नवनवीन संबंधित खात्याची परिपत्रके याची माहिती व्हावी या उद्देशाने "फाईव्ह स्टार न्यूज" या नावाने संस्थेने वार्तापत्र (मासिक) सुरू आहे त्याचाही उपयोग उद्योजक बंधूंना होत आहे.
संस्थेच्या वतीने पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्रामधील विविध समस्या सोडविणेबाबत मा. मुख्यमंत्री, मा. उद्योगमंत्री, मा ऊर्जामंत्री, मा. पालकमंत्री, म्थानिक लोक प्रतिनिधी व शासकीय अधिकारी वर्ग यांच्या समवेत बैठका, हेल्थ कम्प, विविध तंत्रज्ञानाचे सेमिनार घेण्यात आलेचे श्री. हरिश्चंद धोत्रे यांनी सांगितले की संस्थेच्या नूतन जागेमध्ये कर्मचा-यांच्या व तरूणांच्यासाठी कौशल्य विकास केंद स्ट्राईव्ह प्रोजेक्ट तसेच बहुउद्देशीय सुसज्ज हॉल व मॅकचे अद्ययावत ऑफीस लवकरच सुरू करणार असलेचे सांगितले. सदर नवीन वास्तूचे बांधकाम सुरू केले असून सदर वास्तू करिता विविध मान्यवरांनी आर्थिक मदत देवून संस्थेस सहकार्य केलेले आहे त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानले .
त्यांनतर या कार्यकमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्री. डी. टी. शिर्के साहेब यांची ओळख मॅकचे संचालक संजय जोशी यांनी करून दिली व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा ट्रॉफी शाल, पुष्पगुच्छ देवून श्री. हरिश्चंद धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच विविध संघटनांच्या वतीने देखील प्रमुख पाहुणांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेल्या विविध मान्यवर उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
मा. डॉ. श्री. डी. टी. शिर्के यांनी "विद्यापीठ आणि उद्योगांचे सहकार्य - संधी आणि आव्हाने" या विषयावर मार्गदर्शन
माननीय डीटी शिर्के सर यांनी आपल्या वक्तव्यामध्ये उद्योजकांची सद्यस्थिती, भविष्यात येणाऱ्या संधी,अडचणी, काळा बरोबर बदलाव, त्याचे फायदे आणि निर्णय याबाबत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच छत्रपती शिवाजी विद्यापीठ मध्ये मुलांच्या बरोबरीने सध्या मुलींना देखील शिक्षणात खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट सुविधा देण्यात येत असून त्यांना राहण्यासाठी वस्तीग्रह व सुसज्ज अशी अभ्यास केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली असलेचे नमदू केले.
परदेशामध्ये देखील शिवाजी विद्यापीठाचे कामकाज पाहून विद्यापीठाकडे बघण्याचा दर्जा उंचावला आहे व त्या अनुषंगाने तैवान व इतर देशाबरोबर विद्यापीठाकडून वेगवेगळ्या संशोधनासाठी प्रयोग करण्यात आले आहेत.
तसेच शिक्षण संकुला मधील एका विद्यार्थिनीने घेतलेल्या फोटोग्राफी मध्ये आकर्षणाचा भाग ठरला तो म्हणजे एकाच वनस्पतीवर वेगवेगळ्या सव्वीस फुलपाखरांचे फोटो उपस्थितांना दाखवण्यात आले तो मुख्य आकर्षणाचा भाग ठरला.
कार्यक्रमाचे शेवटी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले (मॅक) व छत्रपती शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यामध्ये भविष्यात विद्यापीठ व उद्योजकामधील नवीन संकल्पना याबाबतचा सामंजस्य करार देवाणघेवाण करण्यात आला जेणेकरून मॅक असोसिएशन व विद्यापीठ यांचा उद्योजकांना भविष्यात फायदा होणार आहे.
या कार्यकमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी, केईएचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, झंवर गुपचे चेअरमन नरेंद झंवर, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, उद्योजक श्री सचिन शिरगांवकर, प्रदिपभाई कापडिया, अॅड. विनायकराव आगाशे, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद धोत्रे उपाध्यक्ष, मोहन कुशिरे, ऑन सेकेटरी विट्टल पाटील, ऑन ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी, संजय पेंडसे, यशवंत पाटील, अमृतराव यादव, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, शिवाजीराव भोसले, संगमेश पाटील तसेच सल्लागार सदस्य श्री. गोरख माळी, सचिन कुलकर्णी , श्रीनिवास कुलकर्णी, प्रताप परूळकर तसेच निमंत्रित सदस्य अभिजीत पाटील, विशाल कामते, बाळासाहेव धुळुगडे, सत्यजित सांवत, प्रसाद गुळवणी तसेच मॅकचे सर्व मान्यवर सभासद व उद्योजक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यकमाचे आभार मॅकचे ऑन ट्रेझरर श्री. सुरेश क्षीरसागर यांनी मानले तर सूत्रसंचालन सेकेटरी शंतनू गायकवाड व योगेश गिजवणे यांनी केले. अहवाल वाचन मॅकचे ऑन. सेकेटरी श्री. विठ्ठल पाटील यांनी केले.
हरिश्चंद्र धोत्रे अध्यक्ष,
मोहन कुशिरे, उपाध्यक्ष,
विट्टल पाटील, ऑन सेकेटरी,
सुरेश क्षीरसागर, ऑन ट्रेझरर, मॅक
02/10/2024
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान संपन्न
दिनांक २ ऑक्टोंबर २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले(मॅक) पदाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पदाधिकारी, प्रदुषण नियंत्रक मंडळ पदाधिकारी व मान्यवर उद्योजक कामगार बंधू भगिनींच्या सहकार्याने कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज शनिवार दिनांक ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.
मा. श्री.हरिश्चंद्र धोत्रे- अध्यक्ष- मॅक
शासनाच्या स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व परिसर स्वच्छ, सुंदर व निसर्गमय बनविणे करिता कोल्हापूर मधील सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये आपण स्वच्छता अभियान मोहीम राबवून एक आदर्श निर्माण केला असून उदयोजक व कामगार बंधू भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असे काम करीत असलेचे मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी नमूद केले. लोकांच्या मध्ये जागृता निर्माण झाली असून आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ, सुंदर व निसर्गमय बनविणे करिता एकत्रिपपणे काम करीत आहेत याचा आपल्या सर्वांनाचा अभिमान आहे. क्लीन अँड ग्रीन औद्योगिक वसाहत बनविणेकरिता आम्हास मान्यवर उद्योजक, कामगार बंधू-भगिनी व सर्व शासकीय अधिकारी वर्ग व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य संस्थेस लाभत असलेचे नमूद केले व सर्वांचे आभार व्यक्त केले.
मा. श्री. प्रमोद माने – उप कार्यकारी अधिकारी, मप्रनि महामंडळ, कोल्हापूर
औद्योगिक क्षेत्राचा परिसर स्वच्छ, सुंदर व निसर्गमय बनविण्यासाठी येथील उद्योजक, कामगार व शासकीय अधिकारी वर्ग सतत प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण याठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान मोहीम राबवून सर्वांच्या आरोग्याच्या व निसर्गाच्या दृष्टीने चांगले काम करीत असलेचे नमूद केले. आपण नक्कीच जनहिताचे काम करीत असून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करीत असलेचे नमूद केले व सहकार्याबदल सर्वांचे आभार व्यक्त केले.
मा. श्री. इराप्पा नाईक – कार्यकारी अभियंता, मऔवि महामंडळ, कोल्हापूर
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान मोहीम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे याचे खरच कौतुक आहे. औद्योगिक क्षेत्रात मोठया प्रमाणात मान्यवर उद्योजकांच्या सहकार्याने आपण वृक्षारोपण करत आहोत त्याचा उपयोग आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नक्कीच होत असलेचे दिसून येत असलेचे मा.श्री. इराप्पा नाईक साहेब यांनी नमूद केले. प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी आपण नक्कीच उपाय योजना राबविण्यासाठी प्रयत्न करूया असू नमदू केले. सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान मोहीम यशस्वी करणे करिता मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
मा. श्री. उमेश देशमुख – प्रादेशिक अधिकारी, मऔवि महामंडळ, कोल्हापूर
शासनाच्या स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने स्वच्छता अभियान मोहिम औद्योगिक वसाहतीमध्ये राबविण्यासाठी मॅक चे पदाधिकारी, मान्यवर उद्योजक कामगार बंधू-भगिनी यांनी मोलाचे सहकार्य करीत असलेबद्दल मऔवि महामंडळ कार्यालयाच्या वतीने प्रथमत: आभार व्यक्त केले. उद्योजक आपल्या कंपनीचा जसा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवत असतात त्याच प्रमाणे आपल्या आसपासचा देखील परिसर स्वच्छ ठेवणे करिता प्रयत्न करावेत व एक आदर्श औद्योगिक वसाहत बनविण्यासाठी सहकार्य करावेत अशी विनंती केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी- प्रतिमा पूजन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मॅक येथे मा.श्री. उमेश देशमुख साहेब, प्रादेशिक अधिकारी, मा.श्री.इराप्पा नाईक साहेब, कार्यकारी अभियंता, मऔवि महामंडळ, श्री. प्रमोद माने,उप कार्यकारी अधिकारी, मप्रनि महामंडळ, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन.सेक्रेटरी विटठ्ल पाटील, संचालक यशवंत पाटील, अमृतराव यादव, निमंत्रित सदस्य बाळासाहेब धुळूगडे, मॅक चे इतर मान्यवर पदाधिकारी, मऔवि व मप्रनि महामंडळ अधिकारी मान्यवर उद्योजक यांचे उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मॅक चे मान्यवर पदाधिकारी, संचालक, मऔवि व मप्रनि महामंडळ अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच मॅक चे मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॅक कॅन्टीनच्या नूतन इमारत स्लॅब चे पूजन संपन्न
मॅक च्या नवीन इमारतीमधील मॅक कॅन्टीन च्या नूतन इमारत स्लॅब चे पूजन *आज शुक्रवार दिनांक 20/9/2024 रोजी सकाळी १०.०० वाजता मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे यांच्या शुभ हस्ते व अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे,ऑन सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक यशवंत पाटील व काॅन्ट्क्टर वैभव हांजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
तद्नंतर मॅक बिल्डींग कमिटी अध्यक्ष संजय जोशी साहेब यांनी मॅक कॅन्टीन च्या नूतन इमारत स्लॅब ची कामकाज पहाणी केली.
कळावे,
हरिश्चंद्र धोत्रे,अध्यक्ष,
मोहन कुशिरे, उपाध्यक्ष,
संजय जोशी, अध्यक्ष, बिल्डिंग कमिटी
विठ्ठल पाटील, ऑन. सेक्रेटरी
सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर मॅक
📰 स्ट्राईव्ह प्रकल्पा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मॅक च्या विद्यार्थ्यांना स्मॅक आयटीआय कडून प्रमाणपत्र प्रदान.
--------------------------------
▪️ फाईव्ह स्टार - एमआयडीसी : ११ सप्टें. : स्मॅक आयटीआय कडून स्ट्राईव्ह प्रकल्पा अंतर्गत क्लासरूम प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मॅक च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम मॅक च्या श्रीराम प्रताप झंवर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला.
केंद्र सरकारच्या स्ट्राईव्ह प्रकल्पाच्या सुरुवातीपासून मॅक चे सर्व पदाधिकारी , संचालक व निमंत्रित सदस्य यांच्या अथक प्रयत्नामुळे चांगल्या प्रकारे प्रवेश संख्या झाल्याचे प्रतिपादन मॅक चे चेअरमन हरिश्चंद्र धोत्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले तसेच मॅकच्या होऊ घातलेल्या बेसिक ट्रेनिंग सेंटर ची माहिती दिली.
कार्यक्रमास मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे , मॅक स्ट्राईव्ह प्रकल्पाचे अध्यक्ष संजय पेंडसे , स्मॅक चे उपाध्यक्ष जयदीप चौगले , आयटीआय चे चेअरमन प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॅक ने स्ट्राईव्ह प्रकल्पाचा उत्कृष्टरित्या प्रचार प्रसार करून गरजू मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी योग्य मार्गदर्शन केल्याचे प्रशांत शेळके यांनी सांगितले तसेच मॅक च्या बेसिक ट्रेनिंग साठी स्मॅक कडून पूर्ण सहकार्य मिळेल अशी ग्वाही ही त्यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी स्मॅक चे उपाध्यक्ष जयदीप चौगले , स्मॅक आयटीआयचे प्राचार्य प्रसन्न खेडेकर , इन्स्ट्रक्टर ए. एस. हसुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्मॅक आयटीआय कडून उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम [ एम. ए. पी. एस. ] ची माहिती देऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास मॅक चे ऑ. सेक्रेटरी विठ्ठल पाटील , खजानिस सुरेश क्षीरसागर , संचालक , निमंत्रित सदस्य , उद्योजक , सेक्रेटरी शंतनू गायकवाड आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन स्ट्राईव्ह प्रकल्प पीआरओ योगेश गिजवणे यांनी तर आभार प्रदर्शन स्ट्राईव्ह कमिटी प्रमुख संजय पेंडसे यांनी केले
16/09/2024
नूतन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म उदघाटन समारंभ संपन्न
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील सर्व उद्योजकांना कळविण्यास आनंद होत आहे की,मॅक च्या वतीने उद्योजकांना विद्युत पुरवठा त्वरित उपलब्ध व्हावा या हेतूने महावितरण कार्यालयाकडे सतत संस्थेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे महावितरण मायनर सबस्टेशन येथे नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर झाला असून त्याचे उदघाटन महावितरण चे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते व मा.दत्तात्रय भनगे कार्यकारी अभियंता,मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे,ऑन सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक भावेश पटेल व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मा. हरिश्चंद्र धोत्रे- अध्यक्ष मॅक
मॅक च्या माध्यमातून सतत उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करते असते. त्याचा एक भाग म्हणून उद्योजकांना भासत असलेल्या विद्युत पुरवठा बाबत असणार्या अडचणी लक्षात घेवून महावितरणच्या कार्यकारी अभियंता बनगे साहेब व इतर अधिकारी यांचा मायनर सबस्टेशन* येथे नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर करणे करिता पाठपुरावा मॅक च्या वतीने करण्यात आला व त्याचे उदघाटन आज झाले असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. सदर नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म कार्यान्वित करणे करिता महावितरणच्या सर्वच अधिकारी वर्ग विशेषतः कार्यकारी अभियंता बनगे साहेब व त्यांच्या टीम चे कौतुक केले व आभार व्यक्त केले.
नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म कार्यान्वित झाल्यामुळे सिल्वर झोन फिडर वरील डी व जी ब्लॉक मधील उद्योजकांना सतत खंडित विद्युत पुरवठा बाबत भेडसावणारा प्रश्न आता मार्गी लागणार असलेचे नमूद केले.
मा.स्वप्निल काटकर
मुख्य अभियंता
मायनर सबस्टेशन येथे आज नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म कार्यान्वित झाल्याचे जाहीर केले.
सदरचे कामकाज हे वेळेत पूर्ण करून उद्योजकांच्या अडचणी दूर केल्यामुळे समाधान व्यक्त केले व महावितरणच्या उपस्थित अधिकारी व शाखाप्रमुख, ऑपरेटर्स यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कामकाज करणे करिता शुभेच्छा दिल्या.
मॅक च्या माध्यमातून उद्योजकांच्या विद्युत पुरवठा खंडित बाबत असणार्या समस्या सोडविण्यासाठी सतत महावितरणच्या संबंधित अधिकारी वर्ग यांच्याकडे पाठपुरावा करून नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर करून तो कार्यान्वित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सहकार्य केले आहे त्याबद्दल मॅक पदाधिकारी यांचे विशेष आभार व्यक्त केले.
पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रासाठी अजून तीन ते चार नवीन मायनर सबस्टेशन व एक EHV सबस्टेशन करणे करिता आम्ही येणारा काळात त्याचा पाठपुरावा करू त्यासाठी एमआयडीसी कडून भूखंड उपलब्ध करून घेणे करिता असोसिएशनचे सहकार्य मिळावे अशी ग्वाही मा.स्वप्निल काटकर साहेब यांनी दिली.
मा.दत्तात्रय भनगे -
कार्यकारी अभियंता
मा.दत्तात्रय भनगे साहेब यांनी सांगितले की, नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म मंजूर करून तो कार्यान्वित करण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मुख्य अभियंता स्वप्नील काटकर साहेब मॅक चे पदाधिकारी, मान्यवर उद्योजक बंधू तसेच महावितरण चे अधिकारी ऑपरेटर्स व ठेकेदार या सर्वांचे विशेष आभार मानले.
सदर ट्रान्सफॉर्म बसविण्यासाठी मॅक असोसिएशनचा सतत पाठपुरावा असल्यामुळे आज तो ट्रान्सफॉर्म महावितरण कडून कार्यान्वित करण्यात आला आहे. सदरचे काम वेळेत संबंधित ठेकेदार यांनी पूर्ण करून महावितरणला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानले.
आम्ही येणारा काळात तीन ते चार नवीन मायनर सबस्टेशन व एक EHV सबस्टेशन करणे करिता त्याचा पाठपुरावा करू व उद्योजकांना अखंडितपणे विद्युत पुरवठा देवू अशी ग्वाही मा.दत्तात्रय भनगे साहेब यांनी दिली.
सदर नवीन १० एमव्हीए ट्रान्सफॉर्म कार्यान्वित करणे करिता विविध मान्यवरांनी सहकार्य केले बद्दल स्वागतपर सत्कार महावितरण कडून करण्यात आला.
सदर कार्यक्रमास महावितरण चे मुख्य अभियंता,मा.स्वप्निल काटकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भनगे,उप कार्यकारी अभियंता शिंदे, उप कार्यकारी अभियंता आहुजा, सदानंद मोरे, महावितरणचे इतर अधिकारी व स्टाफ तसेच मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे,ऑन सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक भावेश पटेल, ठेकेदार व इतर मान्यवर उपस्थित होते.
**
मा. श्री. उमेश बी. देशमुख साहेब,
नूतन प्रादेशिक अधिकारी, मऔवि महामंडळ, कोल्हापूर
यांचा मॅक च्या वतीने स्वागतपर सत्कार व पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या बाबत चर्चा करताना मॅक पदाधिकारी.
05/09/2024
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔवि महामंडळ यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विविध विषयाबाबत बैठक संपन्न....
महोदय, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. पी.वेलरासू साहेब, व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. शिवाजी पाटील साहेब, मऔवि महामंडळ उद्योगसारथी,मुंबई येथे काल बुधवार दिनांक ०४/०९/२०२४ रोजी मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे यांनी भेट घेतली.
सर्व प्रथम नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. पी.वेलरासू साहेब यांचा मॅक च्या वतीने बुके देवून स्वागतपर सत्कार करण्यात आला व पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा केली आणि सदर विषय सोडविण्यासाठी विनंती केली.
1. विदूत पुरवठा मिळणेकरिता इन्फ्रास्ट्रक्चर करणे
2. एलईडी स्ट्रीट लाईट बसविणे
3. जीएसटी कर वसूली रद्द करणे
4. Red व Orange Categories मधील उद्योगांना लावणेत येत असलेला पर्यावरण संरक्षण सेवाशुल्क रद्द करणे
5. गोकूळ शिरगाव ते कागल-हातकणंगले पंचतारांकित ओद्योगिक क्षेत्रास जोडणारा ५०० मिटरचा रस्ता करणे
संस्थेच्या माध्यमातून आपण सर्वजण करीत असलेले काम कौतुकास्पद असून सदर कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मांडण्यात आलेल्या समस्या नक्कीच लवकरात लवकर सोडवू अशी ग्वाही नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. पी.वेलरासू साहेब व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. शिवाजी पाटील साहेब यांनी दिली.
तसेच सदर वरील विषयाबाबत संबंधित अधिकारी व असोसिएशन पदाधिकारी यांची एकत्रितपणे लवकरच बैठक घेवून सदर विषय सोडविणेबाबत निर्णय घेवू असे सुचित केले.
सदर बैठकीस मा.श्री. पी.वेलरासू साहेब व उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. शिवाजी पाटील साहेब, नूतन प्रादेशिक अधिकारी उमेश बी देशमुख साहेब, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर रघुनाथ खन्नूरकर व सेक्रेटरी शंतनू गायकवाड उपस्थित होते.
01/09/2024
मा.उद्योगमंत्री यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विविध विषयाबाबत बैठक संपन्न....
काल शनिवार दिनांक ३१/०८/२०२४ रोजी मा.ना.श्री. उदय सामंत साहेब, उद्योगमंत्री यांची हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे व संचालक अनिल जाधव यांनी भेट घेतली व संस्थेच्या वतीने खालील विषयावरती सविस्तर चर्चा केली आणि सदर विषय सोडविण्यासाठी विनंती केली.
उद्योजकांना अखंडीत विदूत पुरवठा मिळणेकरिता महावितरण / मऔवि महामंडळ कार्यालयकडून इन्फ्रास्ट्रक्चर त्वरीत उपलब्ध करून देणे
मा.उद्योगमंत्री साहेब यांनी सांगितले की, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र येथे नवीन सबस्टेशन उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून भूखंड नं. पी-८२ एकूण क्षेत्र ४८१० स्के.मी. हा महावितरण कार्यालयास दिला असून नवीन सबस्टेशन उभारणी बाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे आला आहे. सदर प्रस्तावास लवकरच महावितरण / मऔवि महामंडळ कार्यालयकडून मंजूरी देवू व नवीन सबस्टेशन उपलब्ध करून उद्योजकांना वीज उपलब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.
कागल-हातकणंगले पंचतारांकित औदयोगिक वसाहतीमधील उर्वरित ब्लॉक मध्ये एलईडी स्ट्रीट लाईट बसविणेबाबत मा.उद्योगमंत्री यांनी सदर विषयाच्या अनुषंगाने संगीतले की, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔवि महामंडळ, मुंबई यांच्याकडे सदर प्रस्ताव आला सदर प्रस्तावास लवकरच मंजूरी देत असून उर्वरित कागल-हातकणंगले पंचतारांकित औदयोगिक वसाहतीमध्ये एलईडी स्ट्रीट लाईट बसविणेचे काम लवकरच पूर्ण होईल असे सूचित केले.
22/08/2024
मा. उद्योगमंत्री यांच्या समवेत मॅक च्या AM-28 भूखंड मुदतवाढ बाबत बैठक संपन्न...
दिनांक 22/08/2024 रोजी मा. ना. श्री. उदय सामंत साहेब, उद्योगमंत्री यांच्या समवेत रोटरी समाज सेवा केंद्र, कोल्हापूर येथे मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी संस्थेच्या AM-28 भूखंडास दोन वर्षाची विनाशुल्क मुदतवाढ मिळणेबाबत दिलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मऔवि महामंडळ संचालक मंडळ बैठकीत झालेल्या ठराव बाबत सविस्तर माहीती दिली. संस्थेने कौशल्य विकास केंद्र उभारणी करिता सदर भूखंड घेतला असून त्यास विनाशुल्क मुदतवाढ मिळणे बाबत विनंती केली तसेच मॅक च्या वतीने अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक संजय पेंडसे, कुमार पाटील यांनी संस्थेच्या AM-28 भूखंड मुदतवाढ बाबत मा. ना. श्री. उदय सामंत साहेब, उद्योगमंत्री यांना निवेदन दिले.
मा.उद्योगमंत्री यांनी सदर विषयाच्या अनुषंगाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔवि महामंडळ, मुंबई यांना *विनाशुल्क मुदतवाढ देणेबाबत सूचित करू असे नमूद केले असून आपण त्याबाबत पाठपुरावा करावा असे सांगितले.
21/08/2024
मॅक च्या AM-28 भूखंडास दोन वर्षाची विनाशुल्क मुदतवाढ मिळणे करिता मा. श्री. राजेश क्षीरसागर साहेब, कार्याध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ- कॅबिनेट दर्जा यांची काल दिनांक 21/8/2024 रोजी मॅक अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे समवेत चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष धनंजय दुगे यांनी सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे भेट घेऊन माहिती दिली.
तसेच मा. मुख्यमंत्री व मा. उद्योगमंत्री यांच्या समवेत आज गुरुवार दिनांक 22/8/24 रोजी सदर विषयाच्या अनुषंगाने मॅक पदाधिकारी यांना भेटणे करिता वेळ मिळावी अशी विनंती केली.
15/08/2024
मॅक च्या प्रांगणात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न...
मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या प्रांगणात ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमास मा. श्री. मिलिंद सोनवणे, अग्निशमन अधिकारी, ईएसआयसी हॉस्पिटल चे डॉक्टर, मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर तसेच इतर मॅकचे संचालक, सल्लागार व निमंत्रित सदस्य व मान्यवर उद्योजक तसेच ईएसआयसी हॉस्पिटल व अग्निशमन कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती होते.
सर्वप्रथम सदर कार्यक्रम प्रसंगी मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, मा. श्री. मिलिंद सोनवणे, अग्निशमन अधिकारी, मॅक चे संचालक संजय पेंडसे, सल्लागार सचिन कुलकर्णी, गोरख माळी यांनी ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यव्क्त केले व देशाला ७७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहाने सर्वत्र संपन्न होत आहे त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत असे नमूद केले व संस्थेने केलेल्या व करीत असलेल्या कामकाजाचा आढावा तसेच पर्यावरण , सोई सुविधा व करप्रणाली याबाबत सविस्तर माहिती मांडण्यात आली.
मे. टेक्नोमेट इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर मा. श्री. विजय सोमाणी साहेब यांनी सांगितले की, मॅक असोसिएशन ही संस्था सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठ्या उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत असून संस्थेच्या माध्यमातून उद्योगासाठी लागणारे पाठबळ उद्योजकांना संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व मान्यवर उद्योजक देत आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले व संस्थेच्या वतीने नवीन उभारण्यात येत असलेल्या वास्तू करिता मे. टेक्नोमेट इंडस्ट्रीजच्या वतीने विजय सोमाणी साहेब यांनी रक्कम रुपये २,५०,०००/- (दोन लाख पन्नास हजार मात्र) निधी देणगी म्हणून दिली. मॅक च्या वतीने मा. श्री. विजय सोमाणी साहेब यांचे विशेष आभार व्यक्त केले व सत्कार करण्यात आला.
मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले आहे. त्या सर्व महापुरुषांना,सैनिकांना आपण वंदन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करीत आहोत. सदर दिवस हा सुवर्णमय असून त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवले. इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत-हसत फासावर गेले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ होय. म्हणूनच, हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे असे नमूद केले.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी, समाजसेवकांनी तसेच क्रांतीकारकांनी आयुष्य वाहिले. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मदनमोहन मालवीय, अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी कृपलानी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, रासबिहारी बोस, गोपाळ कृष्ण गोखले, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय, केशवचंद्र सेन, अरविंद घोष, वासुदेव बळवंतरराव फडके, क्रांतीसिंह नाना पाटील, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, बद्रुद्दिन तयैबजी, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास अशांचा उल्लेख केला जातो. ही यादी संपणार नाही कारण अशा नेत्यांसह प्रत्येक भारतीय व्यक्तीही या लढ्यात उतरला होता म्हणूनच आपण स्वातंत्र्य मिळवले.
वंदे मातरम्, वंदे मातरम्!
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,
शस्यश्यामलाम्, मातरम्! वंदे मातरम्!
असे शब्द कानावर पडले की आपोआप आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटू लागतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. परंतु त्याचबरोबर अनेक समस्या ही आपल्या देशाला भेडसावत आहे. महागाई, भ्रष्टाचार, जातीवाद, व्यसनाधीनता, अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभे आहेत. अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजे. तरच, आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम !
संस्थेच्या माध्यमातून पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील असणार्या उद्योजक व कामगार बंधू यांच्या करिता विविध उपक्रम राबविण्यात आले असून त्यामध्ये महारक्तदान, महाआरोग्य शिबीर, विविध सेमिनार्स तसेच विविध सोई -सुविधा उपलब्ध केलेचे नमूद केले. अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही, ट्रक ट्रमिनल, पर्यावरण सेवा शुल्क, वृक्षारोपण, ईएसआय हॉस्पिटल च्या माध्यमातून होत असलेली आरोग्य सेवा इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली तसेच संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या स्ट्राईव्ह प्रोजेक्ट बाबत सविस्तर माहिती दिली व स्ट्राईव्ह प्रोजेक्ट च्या अनुषंगाने स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अध्यक्ष संजय पेंडसे व सर्व टिमचे हार्दिक आभार व्यक्त केले तसेच संस्थेच्या वतीने नवीन उभारण्यात येत असलेल्या वास्तू करिता ज्या मान्यवर उद्योजक बंधू- भगिनींनी तसेच बिल्डिंग कमिटी अध्यक्ष संजय जोशी व सर्व टिमचे मनापासून आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास मिलिंद सोनवणे, अग्निशमन अधिकारी, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक अशोक दुधाणे,संजय पेंडसे, संजय जोशी, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, शिवाजीराव भोसले, संगमेश पाटील, सल्लागार सदस्य गोरख माळी, श्रीनिवास कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, निमंत्रित सदस्य अभिजीत पाटील, बाळासाहेब धुळूगडे, मॅक सभासद विजय सोमाणी, जयराज पाटील तसेच इतर मान्यवर उद्योजक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मॅक चे ऑन.ट्रेझरर सुरेश क्षीरसागर यांनी मानले.
29/06/2024
🌱🌱 *मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज च्या पुढाकाराने १००० रोपांचे वृक्षारोपण संपन्न 🌱🌱
कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व सामाजिक बांधिलकी जतन करीत मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज च्या पुढाकाराने लक्ष्मी टेकडी ते मॅक चौक या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करणेचा उपक्रम हाती घेतला असून शनिवार दिनांक २९/०६/२०२४ रोजी मॅक चौक ते मेनन अल्कोप कंपनी मुख्य रस्त्यालगत मा.श्री. एस.व्ही.अपराज साहेब, उप अभियंता, मऔवि महामंडळ, मा. श्री. मंगेश पाटील साहेब, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, श्री. अविनाश पाटील, सीईओ, मॅक चे माजी अध्यक्ष व संचालक संजय पेंडसे, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक यशवंत पाटील, मुबारक शेख, अमृतराव यादव, स्विकृत संचालक शिवाजीराव भोसले, निमंत्रित सदस्य बाळासाहेब धुळूगडे यांच्या शुभहस्ते व मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा १००० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी मॅक चे माजी अध्यक्ष व संचालक संजय पेंडसे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, मा. श्री. मंगेश पाटील साहेब यांनी मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या माध्यमातून व सामाजिक बांधिलकी च्या भावनेने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये वृक्षारोपण करणेचा मानस हाती घेतला असून सदर उपक्रम अतिशय स्तुत्य असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र हरितमय बनविण्यासाठी मोलाचे योगदान देत असल्याबद्दल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक), मऔवि महामंडळ व पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील मान्यवर उद्योजक यांच्या वतीने श्री. मंगेश पाटील साहेब व मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या च्या सर्व मान्यवर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे विशेष आभार व्यक्त केले सदर उपक्रमास मॅक च्या वतीने शुभेच्छा दिल्या.
तद्नंतर मा.श्री.एस.व्ही.अपराज साहेब, उप अभियंता, मऔवि महामंडळ यांनी आपल्या मनोगतामध्ये नमूद केले की, मा. श्री. मंगेश पाटील साहेब व मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ही सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच पुढाकार घेत असून आजच्या १००० रोपाचे वृक्षारोपण करिता सक्रिय सहभाग घेवून ती आज पूर्ण केली आहेत याचा अभिमान आहे.
सदर वृक्षारोपण केलेल्या रोपांना पाणी पुरवठा करणेचे काम मऔवि महामंडळ कार्यालयाच्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली व सर्वांचे आभार व्यक्त केले.
मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. मंगेश पाटील साहेब यांनी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक), मऔवि महामंडळ कार्यालय तसेच मा.श्री.एस.व्ही.अपराज साहेब यांचे नेहमीच मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला सहकार्य लाभलेले आहे व लाभत आहे त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नेहमीच सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असते त्याचाच एक भाग म्हणून १००० रोपाचे वृक्षारोपण करणेचा उपक्रम आम्ही हाती घेतला असून तो आज आम्ही पूर्ण केलेचे नमूद केले.
सदर रोपांचे संगोपन हे मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या माध्यमातून केले जाईल व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र हरितमय बनविण्यासाठी नेहमीच मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अग्रेसर असेल असे नमूद केले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास मा.श्री. एस.व्ही.अपराज साहेब, उप अभियंता, मऔवि महामंडळ, मा. श्री. मंगेश पाटील साहेब, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, श्री. अविनाश पाटील, सीईओ, मॅक चे माजी अध्यक्ष व संचालक संजय पेंडसे, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक यशवंत पाटील, मुबारक शेख, अमृतराव यादव, स्विकृत संचालक शिवाजीराव भोसले, निमंत्रित सदस्य बाळासाहेब धुळूगडे मोर्या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चे इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया संखेने उपस्थित होते.
13/06/2024
निक्षय मित्र अंतर्गत केंद्रीय पथकाची क्षयमुक्त बाबत माहिती देण्यासाठी मॅकला भेट
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे २२०० रुग्ण उपचार घेत आहेत. मा.पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत कोणतीही दानशूर व्यक्ती किंवा संस्था क्षय रुग्णांना दत्तक घेऊन निक्षय मित्र बनून सहा महिने ते एक वर्षापर्यंत पोषण आहार किट देऊ शकते.
कोल्हापूर जिल्हा मधील क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्था यांनी पुढे येऊन जिल्हा क्षयमुक्त करण्यास हातभार लावावा असे आवाहन केंद्रीय क्षयरोग विभाग,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय,भारत सरकारचे राष्ट्रीय सल्लागार श्री.धर्मा राव व सहाय्यक संचालक,राज्य क्षयरोग विभाग, महाराष्ट्र राज्य डॉ.दिगंबर कानगुले यांनी गुरुवार दिनांक १३/०६/२०२४ रोजी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकलंगले (मॅक) येथील कै. रामप्रताप झंवर सभागृह येथे आयोजित बैठकीत बोलत होते.
सदर बैठकीमध्ये बोलताना डॉ.राव पुढे म्हणाले की २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त करावयाचा आहे. याचाच एक भाग म्हणून क्षयरुग्णांना पोषण आहार किट देणे गरजेचे आहे. जेणेकरून रुग्ण लवकर बरा होईल. मॅक असोसिएशन अंतर्गत सर्व उद्योग संस्था,कंपनी यांना निक्षयमित्र साठी आपण आवाहन करावे असे सुचित केले.
सदर आवाहनास प्रतिसाद देत मॅक असोसिएशनचे अध्यक्ष श्री.हरिश्चंद्र धोत्रे साहेब, श्री. सुरेश क्षीरसागर साहेब यांनी मॅक चे सर्व सदस्य ऊद्योग संस्था, कंपनी यांना याबाबत माहिती देऊन गरजू रुग्णांना फूड बास्केट देण्याबाबत आवाहन केले जाईल असे आश्वासन सदर बैठकीत दिले.
तसेच मॅक असोसिएशन व जिल्हा क्षयरोग केंद्र तर्फे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील असणार्या कंपनी मधील ऑफिस स्टाफ व कर्मचारी यांची मोफत क्षयरोग व इतर आरोग्य तपासणी बाबत आरोग्य शिबीर लवकरच मॅक येथे आयोजित करू तसेच जिल्हा क्षयमुक्त करण्याबाबत आम्ही नक्कीच प्रयत्न करून अशी ग्वाही मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी सदर बैठकीत दिली.
सदर केंद्रीय पथकाबरोबर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदना वसावे,जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव ठाकूर,डॉ. परवेज पटेल, श्री.शिवाजी बर्गे जिल्हा क्षयरोग केंद्राचे विशाल मिरजकर,धनंजय परीट,दिया कोरे,गौरी खैरमोडे, सुनिता नरदगे, पूनम कुंभार,विनोद नायडू,एकनाथ पाटील,एस.टी.एस व एस.टी.एल.एस. कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
05/06/2024
कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात जागतिक पर्यावरण दिन व महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून मॅक, मऔवि महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान मोहिमेस मॅक चौक येथे सुरुवात. किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनी येथे स्वच्छता अभियान मोहीम संपन्न.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे आणि पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी मौर्या ग्रुपच्या सहकार्याने मॅक चौक येथे वृक्षारोपण करताना मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे समवेत इतर मान्यवर अधिकारी वर्ग व उद्योजक बंधू उपस्थित होते.
स्वच्छता मोहीम मध्ये सहभागी MAKH टीम अध्यक्ष- हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष- मोहन कुशिरे, ऑन. सेक्रेटरी - विठ्ठल पाटील, संचालक संजय पेंडसे, अमृतराव यादव, कुमार पाटील व इतर मान्यवर उद्योजक व कामगार बंधू उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर विभाग प्रादेशिक अधिकारी- राहुल भिंगारे, कार्यकारी अभियंता - आय. ए. नाईक, उप अभियंता E& M विभाग - रणजित बिरंजे, तसेच प्रादेशिक कार्यालय व कार्यकारी अभियंता मऔवि महामंडळ अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मडळ कोल्हापूर विभाग
उप प्रादेशिक अधिकारी - प्रमोद माने, अश्विनी पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
6th May 2024
मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांच्या समवेत बैठक संपन्न
कागल-हातकणंगले पंचतारांकित औदयोगिक वसाहतीमधील असणार्या विविध समस्या सोडविणेबाबत आज गुरुवार दि. ०६ मे २०२४ रोजी *श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांच्या समवेत मॅक व गोशिमा औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी यांची बैठक कॉमन फॅसिलिटी सेंटर हॉल, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाली.
सर्व प्रथम सदर बैठकीत मॅक व गोशिमा च्या वतीने मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर तसेच श्री. गजेंद्र लोहार, पोलीस निरिक्षक कागल व श्री. दिगंबर गायकवाड पोलिस निरिक्षक गोकुळ शिरगाव यांचे स्वागत करण्यात आले.
सदर बैठकीत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर व संचालक कुमार पाटील, मुबारक शेख व निमंत्रित सदस्य विशाल कामते यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील खालील समस्या सोडविणेबाबत मॅक च्या वतीने विनंती केली व समस्यांचे निवेदन दिले.
१. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात यावे तसेच पेट्रोलिंग बाबत व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज पाठविणे, QR कोड माहिती देणे व सोमवारी सुट्टी दिवशी मोठ्या प्रमाणात करण्यात यावे.
२. एन एच 4 - नॅशनल हायवे (लक्ष्मी टेकडी) येथे ट्राफीक पोलीस नियुक्ती करणे.
३. नवीन होत असलेल्या पोलीस चौकी करिता लागणारा स्टाफ उपलब्ध करून देणे.
४. अतिक्रमण काढणे करिता पोलिस बंदोबस्त मिळणे.
५. अवैधधंदे बंद करणे.
६. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये घडत असलेले गुन्हे, अपघात बाबत नोंद गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन येथे नोंद करून घेणे.
७. सुरक्षेच्या दृष्टीने सिसिटीव्ही कॅमेरे बसविणे करिता एकत्रितपणे पहाणी करणे.
८. चोरी व लूटमार प्रकार थांबविणे करिता योग्य ती उपाय योजना करणे तसेच ज्या मालाची चोरी झाली आहे त्या मालाच्या किमती ऐवढी चोरीची नोंद दाखल करून घेणे.
९. मॅक चौक येथील मुख्य रस्त्यावरती लावणेत येणार्या चारचाकी वाहनावर कारवाई करणे.
१०. परप्रांतीय कामगार वर्ग यांची माहिती ठेवणे.
११. लक्ष्मी टेकडी ते हुपरी या मुख्य रस्त्यावर चार चाकी व टू व्हीलर स्पीड लिमिट बाबत कारवाई करणे.
१२. अनाधिकृत खंडणी / देणगी / वर्गणी मागणी करिता येणार्या फाळकुटदार यांचे वरती कारवाई करणे.
१३. एन एच 4 - नॅशनल हायवे वरील सुरू असणारे ६ लाईन कामकाज करणार्या कंत्राटदार यांना सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूकीस अडथळा होणारा नाही व वळण ठिकाणी योग्य ते नामफलक रिफ्लेक्टेड लावणेस सूचित करणे.
मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब ---
- मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब यांनी सांगितले की, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सदया सुरू असलेल्या पेट्रोलिंग मध्ये वाढ करणेत येईल तसेच व्हाट्सअप ग्रुप तयार करून पेट्रोलिंगचे मेसेज पाठविणेत येईल व QR कोड माहिती संकलन करणेत येईल.
पोलीस चौकी करिता लागणारा स्टाफ उपलब्ध करून देण्यासाठी मा. जिल्हापोलीस प्रमुख यांना विनंती करू व स्टाफ उपलब्ध करून देवू तसेच एन एच 4 - नॅशनल हायवे वरील (लक्ष्मी टेकडी) येथे सकाळी व सायंकाळी च्या वेळेस ट्राफिक पोलीस उपलब्ध करून करू असे नमूद केले.
तद्नंतर त्यांनी अतिक्रमण काढणे करिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडून तारीख कळविण्यात यावी त्या दिवशी आम्ही बंदोबस्त उपलब्ध करून देवू तसेच अवैधधंदे बंद करणे करिता योग्य ती कार्यवाही आम्ही त्वरीत करू अशी ग्वाही दिली.
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही ठिकाणी काही गुन्हे, अपघात, चोरी अथवा इतर काही बाबी घडल्यास सदरची नोंद ही उद्योजकांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला करण्यात यावी त्याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आमच्या कार्यालयाच्या वतीने सूचित करीत आहोत व त्यांची नोंद घेण्यात येईल असे सांगितले.
सिसिटीव्ही कॅमेरे बसविणे करिता लोकेशन ठरविणेसाठी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे प्रतींनिधी देण्यात येईल व लागणारी मदत केली जाईल तसेच चोरी व लुटमारीचे प्रकार घडू नयेत या करिता आम्ही गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढ करू व त्याबाबत दक्षता घेवू व संबंधित ज्या स्क्रॅप गोळा करणार्या महिला वर्ग टोळ्या आहेत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करू असे नमूद केले.
अनाधिकृत खंडणी /वर्गणी मागणी करिता येणार्या फाळकुटदार टोळी बाबत उद्योजकांनी त्वरीत पोलीस स्टेशनशी संपर्क करावा व माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करणे सोईचे होईल असे नमूद केले.
मॅक चौक येथील मुख्य रस्त्यावरती लावणेत येणार्या चारचाकी वाहनावरती पोलीस कारवाई करतील तसेच औद्योगिक क्षेत्रात परप्रांतीय काम करीत असलेल्या कामगार वर्ग यांची माहिती संकलित करून आपणास लवकरच देण्यात येईल असे सूचित केले.
पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद करणेकरिता अथवा अन्य कारणाकरिता येणार्या प्रत्येक उद्योजकास, व्यक्तीस पोलीस स्टेशनमधील असणार्या स्टाफकडून योग्य प्रकारे माहिती व सहकार्य करण्यात येईल याची दक्षता घेवू असे नमूद केले.
एन एच 4 - नॅशनल हायवे वरील सुरू असणारे ६ लाईन कामकाज करणार्या कंत्राटदार यांना
सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूकीस अडथळा होणारा नाही व वळण ठिकाणी योग्य ते नामफलक
रिफ्लेक्टेड लावणे बाबत संबंधित अधिकारी यांचेकडून सूचित करू सांगितले.
वरील सर्व विषयावरती सविस्तरपणे चर्चा करण्यात आली व त्या सोडविणेसाठी नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाशी मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब यांनी दिली.
सदर बैठकीस मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, श्री. गजेंद्र लोहार, पोलीस निरिक्षक कागल व श्री. दिगंबर गायकवाड पोलिस निरिक्षक गोकुळ शिरगाव तसेच मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, गोशिमा अध्यक्ष नितिन दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅक चे ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक मुबारक शेख, कुमार पाटील, निमंत्रित सदस्य विशाल कामते तसेच गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्रातील इतर मान्यवर उद्योजक उपस्थित होते.
कळावे,
हरिश्चंद्र धोत्रे,अध्यक्ष
मोहन कुशिरे,उपाध्यक्ष विठ्ठल पाटील,ऑन.सेक्रेटरी
सुरेश क्षीरसागर,ऑन. ट्रेझरर
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक)
6th May 2024
मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांच्या समवेत बैठक संपन्न
कागल-हातकणंगले पंचतारांकित औदयोगिक वसाहतीमधील असणार्या विविध समस्या सोडविणेबाबत आज गुरुवार दि. ०६ मे २०२४ रोजी *श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांच्या समवेत मॅक व गोशिमा औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी यांची बैठक कॉमन फॅसिलिटी सेंटर हॉल, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाली.
सर्व प्रथम सदर बैठकीत मॅक व गोशिमा च्या वतीने मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर तसेच श्री. गजेंद्र लोहार, पोलीस निरिक्षक कागल व श्री. दिगंबर गायकवाड पोलिस निरिक्षक गोकुळ शिरगाव यांचे स्वागत करण्यात आले.
सदर बैठकीत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर व संचालक कुमार पाटील, मुबारक शेख व निमंत्रित सदस्य विशाल कामते यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील खालील समस्या सोडविणेबाबत मॅक च्या वतीने विनंती केली व समस्यांचे निवेदन दिले.
१. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात यावे तसेच पेट्रोलिंग बाबत व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज पाठविणे, QR कोड माहिती देणे व सोमवारी सुट्टी दिवशी मोठ्या प्रमाणात करण्यात यावे.
२. एन एच 4 - नॅशनल हायवे (लक्ष्मी टेकडी) येथे ट्राफीक पोलीस नियुक्ती करणे.
३. नवीन होत असलेल्या पोलीस चौकी करिता लागणारा स्टाफ उपलब्ध करून देणे.
४. अतिक्रमण काढणे करिता पोलिस बंदोबस्त मिळणे.
५. अवैधधंदे बंद करणे.
६. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये घडत असलेले गुन्हे, अपघात बाबत नोंद गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन येथे नोंद करून घेणे.
७. सुरक्षेच्या दृष्टीने सिसिटीव्ही कॅमेरे बसविणे करिता एकत्रितपणे पहाणी करणे.
८. चोरी व लूटमार प्रकार थांबविणे करिता योग्य ती उपाय योजना करणे तसेच ज्या मालाची चोरी झाली आहे त्या मालाच्या किमती ऐवढी चोरीची नोंद दाखल करून घेणे.
९. मॅक चौक येथील मुख्य रस्त्यावरती लावणेत येणार्या चारचाकी वाहनावर कारवाई करणे.
१०. परप्रांतीय कामगार वर्ग यांची माहिती ठेवणे.
११. लक्ष्मी टेकडी ते हुपरी या मुख्य रस्त्यावर चार चाकी व टू व्हीलर स्पीड लिमिट बाबत कारवाई करणे.
१२. अनाधिकृत खंडणी / देणगी / वर्गणी मागणी करिता येणार्या फाळकुटदार यांचे वरती कारवाई करणे.
१३. एन एच 4 - नॅशनल हायवे वरील सुरू असणारे ६ लाईन कामकाज करणार्या कंत्राटदार यांना सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूकीस अडथळा होणारा नाही व वळण ठिकाणी योग्य ते नामफलक रिफ्लेक्टेड लावणेस सूचित करणे.
मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब ---
- मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब यांनी सांगितले की, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सदया सुरू असलेल्या पेट्रोलिंग मध्ये वाढ करणेत येईल तसेच व्हाट्सअप ग्रुप तयार करून पेट्रोलिंगचे मेसेज पाठविणेत येईल व QR कोड माहिती संकलन करणेत येईल.
पोलीस चौकी करिता लागणारा स्टाफ उपलब्ध करून देण्यासाठी मा. जिल्हापोलीस प्रमुख यांना विनंती करू व स्टाफ उपलब्ध करून देवू तसेच एन एच 4 - नॅशनल हायवे वरील (लक्ष्मी टेकडी) येथे सकाळी व सायंकाळी च्या वेळेस ट्राफिक पोलीस उपलब्ध करून करू असे नमूद केले.
तद्नंतर त्यांनी अतिक्रमण काढणे करिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाकडून तारीख कळविण्यात यावी त्या दिवशी आम्ही बंदोबस्त उपलब्ध करून देवू तसेच अवैधधंदे बंद करणे करिता योग्य ती कार्यवाही आम्ही त्वरीत करू अशी ग्वाही दिली.
कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही ठिकाणी काही गुन्हे, अपघात, चोरी अथवा इतर काही बाबी घडल्यास सदरची नोंद ही उद्योजकांनी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला करण्यात यावी त्याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आमच्या कार्यालयाच्या वतीने सूचित करीत आहोत व त्यांची नोंद घेण्यात येईल असे सांगितले.
सिसिटीव्ही कॅमेरे बसविणे करिता लोकेशन ठरविणेसाठी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे प्रतींनिधी देण्यात येईल व लागणारी मदत केली जाईल तसेच चोरी व लुटमारीचे प्रकार घडू नयेत या करिता आम्ही गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढ करू व त्याबाबत दक्षता घेवू व संबंधित ज्या स्क्रॅप गोळा करणार्या महिला वर्ग टोळ्या आहेत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करू असे नमूद केले.
अनाधिकृत खंडणी /वर्गणी मागणी करिता येणार्या फाळकुटदार टोळी बाबत उद्योजकांनी त्वरीत पोलीस स्टेशनशी संपर्क करावा व माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करणे सोईचे होईल असे नमूद केले.
मॅक चौक येथील मुख्य रस्त्यावरती लावणेत येणार्या चारचाकी वाहनावरती पोलीस कारवाई करतील तसेच औद्योगिक क्षेत्रात परप्रांतीय काम करीत असलेल्या कामगार वर्ग यांची माहिती संकलित करून आपणास लवकरच देण्यात येईल असे सूचित केले.
पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंद करणेकरिता अथवा अन्य कारणाकरिता येणार्या प्रत्येक उद्योजकास, व्यक्तीस पोलीस स्टेशनमधील असणार्या स्टाफकडून योग्य प्रकारे माहिती व सहकार्य करण्यात येईल याची दक्षता घेवू असे नमूद केले.
एन एच 4 - नॅशनल हायवे वरील सुरू असणारे ६ लाईन कामकाज करणार्या कंत्राटदार यांना
सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूकीस अडथळा होणारा नाही व वळण ठिकाणी योग्य ते नामफलक
रिफ्लेक्टेड लावणे बाबत संबंधित अधिकारी यांचेकडून सूचित करू सांगितले.
वरील सर्व विषयावरती सविस्तरपणे चर्चा करण्यात आली व त्या सोडविणेसाठी नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाशी मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब यांनी दिली.
सदर बैठकीस मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, श्री. गजेंद्र लोहार, पोलीस निरिक्षक कागल व श्री. दिगंबर गायकवाड पोलिस निरिक्षक गोकुळ शिरगाव तसेच मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, गोशिमा अध्यक्ष नितिन दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅक चे ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक मुबारक शेख, कुमार पाटील, निमंत्रित सदस्य विशाल कामते तसेच गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्रातील इतर मान्यवर उद्योजक उपस्थित होते.
कळावे,
हरिश्चंद्र धोत्रे,अध्यक्ष
मोहन कुशिरे,उपाध्यक्ष विठ्ठल पाटील,ऑन.सेक्रेटरी
सुरेश क्षीरसागर,ऑन. ट्रेझरर
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक)
9th April 2024
G-Block येथे डांबरीकरण करणे चे काम सुरु
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे MAKH च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते करणेबाबत केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे अंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर झाली असून *G-Block येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणेचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे.
तसेच पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित रस्त्यांची कामे देखील मंजूर झाली असून लवकरच ती देखील सुरू होत असून पूर्ण करण्यात येणार आहेत याची सर्व मान्यवर सभासद बंधूंनी नोंद घ्यावी ही विनंती.
कळावे,
हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष
मोहन कुशिरे, उपाध्यक्ष
विठ्ठल पाटील, ऑन. सेक्रेटरी
सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर, मॅक
9th April 2024
मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री यांच्या समवेत उद्योजकांची बैठक संपन्न
कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजक व कामगार बंधूंना लागणार्या मूलभूत विविध सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मॅक च्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केलेल्या विविध कामांना मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी त्वरीत मंजूरी दिली असून त्यामधील काही कामांची सुरुवात देखील कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेली आहे.
सदर कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये मंजूर केलेल्या एकूण जवळपास ७९ कोटी १६ लाख रुपये कामाच्या अनुषंगाने मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल -हातकणंगले (मॅक) च्या वतीने मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा जाहीर सत्कार मॅकचे पदाधिकारी, संचालक व मान्यवर उद्योजक यांच्या हस्ते हॉटेल पॅव्हेलियन येथे दिनांक ०८/०४/२०२४ रोजी झालेल्या कृतज्ञता सोहळाच्या बैठकीत करण्यात आला.
सदर बैठकीत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी कोल्हापूर जिल्हातील सर्व औद्योगिक क्षेत्रात मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब यांनी मंजूर केलेल्या कामांची माहिती उपस्थित मान्यवर उद्योजक यांना दिली तसेच सदया उद्योजकांना भेडसावत असणाऱ्या समस्यामध्ये उदा. वाढीव विदूत पुरवठा तसेच नवीन कनेक्शन उपलब्ध त्वरीत करून देणे, जीएसटी कर रद्द करणे, दुहेरी कर रद्द करणे, गोकुळ शिरगाव हालसवडे ते कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र रस्ता करणे, उर्वरित औद्योगिक क्षेत्रात एलईडी बसविणे, पोलीस चौकी व स्टाफ लवकरात लवकर करणे व कोल्हापूर ला नवीन इंजिनिअरिंग मोठा उद्योग आणणे इत्यादी विषयांच्या मागण्या मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब, यांच्या समोर मॅक च्या वतीने मांडण्यात आल्या.
तद्नंतर मा. खासदार श्री. धनंजय महाडीक साहेब, यांनी कोल्हापूर येथील ईएसआय हॉस्पिटल व विमानतळ उभारणी करिता विशेष प्रयत्न केल्याबद्दल सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने आभार व्यक्त केले व मॅक च्या वतीने मॅकचे पदाधिकारी, संचालक व मान्यवर उद्योजक यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
मा. खासदार श्री. संजयजी मंडलिक साहेब, यांनी कोल्हापूर येथील ईएसआय हॉस्पिटल अद्यावत असे सुरू करणेकरिता तसेच कोल्हापूर येथील औद्योगिक क्षेत्रात कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्वरीत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने सर्व औद्योगिक क्षेत्रात सेवा दवाखाने सुरू करणे करिता विशेष मोलाचे सहकार्य केल्याबद्दल सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने आभार व्यक्त केले व मा. खासदार श्री. संजयजी मंडलिक साहेब यांचे चिरंजीव विरेंद्र मंडलिक साहेब यांचा मॅक च्या वतीने मॅकचे पदाधिकारी, संचालक व मान्यवर उद्योजक यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
तद्नंतर मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सीआयआय चे अध्यक्ष अजय सप्रे, उपाध्यक्ष सारंग जाधव, केईए अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष व खजानिस कमलकांत कुलकर्णी, गोशिमा फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष दिपक चोरगे आदी मान्यवर उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, कोल्हापूर जिल्हातील उद्योजकांच्या उद्योगाशी निगडीत असणार्या मागण्या पुर्ण करणेकरिता नेहमीच सहकार्य करू असे नमदू केले.
कोल्हापूर जिल्हातील औद्योगिक क्षेत्राच्या विकास कामासाठी एकूण १५६.७५ कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून ती प्रगतीपथावर असलेचे नमूद केले. कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये मंजूर केलेल्या एकूण जवळपास ७९ कोटी १६ लाख रुपये कामाच्या अनुषंगाने मॅकच्या वतीने माझा विशेष सत्कार केल्याबद्दल मॅक चे विशेष आभार व्यक्त केले व उर्वरित प्रलंबित राहिलेली कामे देखील लवकरच मंजूर करून ती पुर्ण करू अशी ग्वाही मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब यांनी दिली.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. खासदार श्री. धनंजय महाडीक साहेब, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष श्री. ललित गांधी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब, मा. खासदार श्री. धनंजय महाडीक साहेब, श्री. विरेंद्र मंडलिक साहेब, श्री. मुरलीधर जाधव साहेब, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. ललित गांधी, मॅक,चेंबर ऑफ कॉमर्स, केईए, स्मक, गोशिमा, सीआयआय, कोल्हापूर उद्यम सोसायटी, आयटी असोसिएशन व इतर औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, संचालक व मान्यवर उद्योजक मोठ्या संखेने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन गोशिमाचे माजी अध्यक्ष व संचालक मोहन पंडितराव यांनी केले व आभार प्रदर्शन चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक व मॅक चे निमंत्रित सदस्य विद्यानंद मुंढे यांनी मानले.
कळावे,
हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष
मोहन कुशिरे, उपाध्यक्ष
विठ्ठल पाटील, ऑन. सेक्रेटरी
सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर, मॅक
9th April 2024
H-Block येथे LED स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम सुरु
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे MAKH च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित अंतर्गत (H, F & T) ब्लॉक मधील रस्त्यालगत LED स्ट्रीट लाईट बसविणे बाबत केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे एकूण रक्कम रुपये 66 लाख मंजुर झाले असून H- ब्लॉक मधील अंतर्गत रस्त्यालगत LED स्ट्रीट लाईट बसविणेचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सबंधित कंत्राटदाराने सुरू केले आले आहे.
तसेच पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित F व T ब्लॉक ठिकाणी LED स्ट्रीट लाईट बसविणेचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लवकरच सुरू होत असून पूर्ण करण्यात येणार आहेत याची मान्यवर सभासद बंधूंनी नोंद घ्यावी ही विनंती.
कळावे,
हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष
मोहन कुशिरे,उपाध्यक्ष
विठ्ठल पाटील, ऑन.सेक्रेटरी
सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर, मॅक
5th April 2024
मॅक येथे पाणपोई ची सुविधा सुरू
सदया सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये थंडगार पाणी पिण्यासाठी त्वरीत उपलब्ध व्हावे या हेतूने मॅक च्या वतीने व मॅक चे ऑन. ट्रेझरर व सद्गुरुकृपा ऑटोमेशनचे प्रोप्रा. श्री.सुरेश क्षीरसागर साहेब यांच्या सहकार्याने दिनांक ०५/०४/२०२४ रोजी मॅक येथे पाणपोई ची सुविधा मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे व ऑन. ट्रेझरर श्री.सुरेश क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. तरी सदर पाणपोईचा लाभ घ्यावा ही विनंती.
कळावे,
हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष,
मोहन कुशिरे, उपाध्यक्ष,
संजय जोशी, अध्यक्ष, बिल्डिंग कमिटी
विठ्ठल पाटील, ऑन. सेक्रेटरी
सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर मॅक
13th March 2024
मॅक नवीन इमारत मधील पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू
मॅक च्या मान्यवर उद्योजक सभासद बंधूंच्या सहकार्यातून साकारण्यात येत असलेल्या भव्य अशा "मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले" (मॅक)च्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबची सुरवात आज बुधवार दिनांक 13/3/2024 रोजी सकाळी १०.०० वाजता मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक मुबारक शेख व कॉंट्रॅक्टर वैभव हांजे
यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. सदर स्लॅब च्या अनुषंगाने कामकाजाबाबत मॅक बिल्डींग कमिटीचे अध्यक्ष संजय जोशी व मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे यांनी पहाणी केली.
2nd February 2024
चेंबर चषक क्रिकेट स्पर्धा- २०२४ टी शर्ट अनावरण
6th February 2024
Dr. Raghunath A. Mashelkar, Padma Vibhushan, Padma Bhushan, Padmashri, Maharashtra Bhushan, Former Director of CSIR & Chancellor of Jio Institute & ICT Mumbai यांचा आज दिनांक ०६/०२/२०२४ रोजी हॉटेल सयाजी, कोल्हापूर मॅक च्या वतीने स्वागतपर सत्कार करताना मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक संजय पेंडसे, भावेश पटेल व इतर मान्यवर
कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी मा.श्री.अमोल येडगे साहेब यांचा आज दिनांक ०६/०२/२०२४ रोजी मॅक च्या वतीने स्वागतपर सत्कार करताना मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर तसेच इतर सर्व संचालक व निमंत्रित सदस्य.
26th January 2024
मॅक च्या प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक दिन मा.श्री.किरण पाटील साहेब यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न...
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणगले (मॅक) च्या प्रांगणात मा.श्री.किरण पाटील साहेब, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि. यांच्या शुभहस्ते ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. सदरच्या ध्वजारोहन कार्यक्रमास उपस्थित असणार्या मा.श्री.किरण पाटील साहेब, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि., अग्निशमन अधिकारी श्री. मिलिंद सोनवणे, सेवा दवाखाना (ईएसआय) डॉक्टर व त्यांचे सहकारी तसेच मॅक चे सर्व संचालक, निमंत्रित सदस्य व मान्यवर उद्योजकांचे स्वागत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी केले.
मा. श्री. किरण पाटील साहेब यांचा मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व बुके देवून सत्कार करण्यात आला तसेच इतर उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार मॅक च्या विविध पदाधिकारी यांच्या हस्ते बुके देवून करण्यात आला.
उद्योगाशी निगडीत असणार्या दैनंदिन घडामोडी, विविध शासकीय परिपत्रके व माहिती उद्योजकांना त्वरीत उपलब्ध व्हावी या हेतूने मॅक च्या वतीने सुरू केलेल्या “फाईव्ह स्टार न्यूज” या नूतन मासिकाच्या आवृत्तीचे प्रकाशन मा. श्री. किरण पाटील साहेब यांच्या शुभहस्ते व मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, फाईव्ह स्टार न्यूज चे संपादक अशोक दुधाणे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, उप संपादक संजय पेंडसे तसेच मॅक चे मान्यवर संचालक, सल्लागार व निमंत्रित सदस्य मान्यवर सभासद उद्योजक बंधूंच्या उपस्थितीत करण्यात आले.
मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेने १६ वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा सर्वासमोर मांडला तसेच संस्थेच्या सदयाच्या सुरू असलेल्या नूतन इमारत बांधकाम व निधीबाबत माहिती उपस्थित मान्यवरांना दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. श्री. किरण पाटील साहेब यांनी ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व उद्योग, व्यवसाय बाबत जगातील होत असलेल्या घडामोडी बाबत सविस्तर माहिती दिली. मेक इन इंडिया, डीफेन्स इत्यादी बाबत माहिती दिली व त्याच्या धर्तीवर उद्योगांची प्रगती होत चालली असलेचे नमूद केले. तद्नंतर मॅक पदाधिकारी व पचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सर्व मान्यवर उद्योजकांचे त्यांनी विशेष आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास अग्निशमन अधिकारी मिलिंद सोनवणे व त्यांचे सहकारी, सेवा दवाखाना स्टाफ, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन.सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन.ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक अशोक दुधाणे, संजय पेंडसे, संजय जोशी, यशवंत पाटील, अमृतराव यादव, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील, स्विकृत संचालक शिवाजी भोसले तसेच निमंत्रित सदस्य अभिजीत पाटील, बाळासाहेब धुळूगडे, मॅक चे माजी संचालक जयराज पाटील, कॉंन्ट्रक्टर वैभव हांजे मॅक चे मान्यवर उद्योजक बंधू भगिनी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार ऑन.ट्रेझरर सुरेश क्षीरसागर यांनी मानले.
कळावे,
आपले विश्वासू,
हरिश्चंद्र धोत्रे - अध्यक्ष
मोहन कुशिरे - उपाध्यक्ष
विठ्ठल पाटील- ऑन. सेक्रेटरी
सुरेश क्षीरसागर- ऑन. ट्रेझरर, मॅक
17th January 2024
17/01/2024 रोजी कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथे स्ट्राइव्ह प्रोजेक्ट संदर्भात माहिती देण्यासाठी मॅक कमिटी मधून मा. संजय पेंडसे. स्ट्राइव्ह प्रोजेक्ट. अध्यक्ष. तसेच माननीय शिवाजीराव भोसले. स्वि. संचालक. उपस्थित होते. उद्योजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ आम्ही स्ट्राइव्ह प्रोजेक्ट मधून उद्योजकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांना या प्रोजेक्ट विषयी माहिती पोहोचवावी असे संबोधण्यात आले.
तसेच श्री. एस. एन. अलगुडे मुख्याध्यापक कोगनोळी हायस्कूल व श्री एस. पी. कुलकर्णी सर व श्री. अमोल आवटे सर व श्री. आर. ए. डोंगरे सर यांनी मॅक असोसिएशनचे आभार व्यक्त केले
कार्यक्रमाच्या शेवटी स्ट्राइव्ह प्रोजेक्ट मॅक असोसिएशन तर्फे सर्व शिक्षक व स्टाफ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
दिनांक 17/1/2024 रोजी कळंबा आय टी आय येथे माननीय भास्कर. रा. घोरपडे. कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार स्ट्राइव्ह प्रोजेक्ट संदर्भात माहिती देण्यासाठी कळंबा आयटीआय येथे आमंत्रित केले होते. त्यावेळी मोटर मेकॅनिक. डिझेल मेकॅनिक. इलेक्ट्रॉनिक्स. या विभागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना स्ट्राइव्ह प्रोजेक्ट विषयी माहिती सांगण्यात आली.
1St January 2024
विदूत पुरवठा समस्याबाबत बैठक संपन्न...
महोदय, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील विदूत पुरवठा समस्याबाबत मा.ना.श्री.हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री यांच्या समवेत आज सोमवार दिनांक 01/01/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मॅक पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन.ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक संजय पेंडसे, कुमार पाटील, स्विकृत संचालक शिवाजीराव भोसले, निमंत्रित सदस्य विशाल कामते, सत्यजित सावंत व मॅक चे मान्यवर सभासद अविनाश सोनी यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील विदूत पुरवठा समस्या बाबत माहिती दिली.
लघु, मध्यम व मोठ्या अशा जवळपास ३५ ते ४० उद्योजकांनी उद्योगासाठी लागणारी वीज मिळणेकरिता अर्ज दाखल केले असून त्यांना विदूत पुरवठा उपलब्ध होत नसलेबाबत सांगितले.
महावितरणच्या ३३/११ केव्ही पंचतारांकित औद्योगिक उपकेंद्रामध्ये ३३ केव्ही चा फिडर बे व इतर पायाभूत सुविधा तातडीने करणे अत्यंत गरजेचे असून त्याकरिता लागणार्या निधीची तरतूद सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२०२४ अंतर्गत करण्यात यावी अशी संस्थेच्या वतीने मागणी करण्यात आली व उद्योजकांना लवकरात लवकर विदूत पुरवठा उपलब्ध करणेकरिता सहकार्य करावेत अशी विनंती करण्यात आली.
मा.ना.श्री.हसन मुश्रीफ साहेब यांनी उपस्थित असलेले संबंधित अधिकारी यांना सांगितले की, सदर विषय करिता लागणार्या निधीची तरतूद त्वरित सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२०२४ अंतर्गत करण्यात यावी व लवकरात लवकर महावितरण कार्यालाकडून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून विदूत पुरवठा उद्योजकांना मिळणेकरिता सहकार्य करावे असे सूचित केले.
लक्ष्मी टेकडी अपघात व सुरक्षा बाबत चर्चा
मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे व इतर पदाधिकारी यांनी लक्ष्मी टेकडी येथील होत असलेले अपघात व औद्योगिक सुरक्षा बाबत मा. पालकमंत्री व जिल्हा पोलीस प्रमुख यांना माहिती दिली.
मा. पालकमंत्री यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना लक्ष्मी टेकडी येथे ट्राफिक पोलीस कार्यान्वित करण्यात यावेत तसेच पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोलिंग वाढविण्यात यावे व उद्योजकांना सहकार्य करावे असे नमूद केले.
सदर बैठकीस पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, महावितरण अधिकारी व इतर संबंधित अधिकारी, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन.ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक संजय पेंडसे, कुमार पाटील, स्विकृत संचालक शिवाजीराव भोसले, निमंत्रित सदस्य विशाल कामते, सत्यजित सावंत व मॅक चे मान्यवर सभासद अविनाश सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
26th December
मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
आज दिनांक २६/१२/२०२३ रोजी रत्नागिरी येथे मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देताना स्मॅक चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, स्मॅक चे उपाध्यक्ष जयदीप चौगुले, ऑन. खजानीस बदाम पाटील व इतर मान्यवर.
26th December
मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
आज दिनांक २६/१२/२०२३ रोजी रत्नागिरी येथे मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देताना स्मॅक चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, मॅक चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, स्मॅक चे उपाध्यक्ष जयदीप चौगुले, ऑन. खजानीस बदाम पाटील व इतर मान्यवर.
24th December
MAS Association Industrial Expo 2023 प्रदर्शनास सदिच्छा भेट
MAS Association, Satara यांच्या वतीने आयोजित केलेल्या MAS Industrial Expo 2023 या Industrial प्रदर्शनास SMAK चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, MAKH चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, संचालक संजय पेंडसे, KEA उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी आज दिनांक 24/12/23 रोजी सदिच्छा भेट दिली.
सदर भेटीप्रसंगी MAS Association चे पदाधिकारी यांनी SMAK चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, MAKH चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, संचालक संजय पेंडसे, KEA उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर या पदाधिकाऱ्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला व MAS असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर प्रदर्शनास आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल MAS असोसिएशनच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
10th December
मा.ना.श्री.हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री यांच्या समवेत मॅक पदाधिकारी यांची विदूत पुरवठा समस्याबाबत बैठक संपन्न...
महोदय, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील विदूत पुरवठा समस्याबाबत मा.ना.श्री.हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री यांच्या समवेत आज रविवार दिनांक १०/१२/२०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता कागल येथील त्यांच्या घरी मॅक पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, निमंत्रित सदस्य अभिजीत पाटील, बाळासाहेब धुळुगडे व मॅक चे मान्यवर सभासद अविनाश सोनी यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील विदूत पुरवठा समस्या बाबत माहिती दिली.
लघु, मध्यम व मोठ्या अशा जवळपास ३५ ते ४० उद्योजकांनी उद्योगासाठी लागणारी वीज मिळणेकरिता महावितरण कार्यालयाकडे अर्ज दाखल केले असून त्यांना विदूत पुरवठा उपलब्ध होत नसलेबाबत सांगितले. महावितरणच्या ३३/११ केव्ही पंचतारांकित औद्योगिक उपकेंद्रामध्ये ३३ केव्ही चा फिडर बे व इतर पायाभूत सुविधा तातडीने करणे अत्यंत गरजेचे असून त्याकरिता लागणार्या निधीची तरतूद सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२०२४ अंतर्गत करण्यात यावी अशी संस्थेच्या वतीने मागणी करण्यात आली व उद्योजकांना लवकरात लवकर विदूत पुरवठा उपलब्ध करणेकरिता सहकार्य करावेत अशी विनंती करण्यात आली.
मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांनी सांगितले की, सदरचा विषय मी नागपूर येथे सदया सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये मांडून तो सोडविण्यासाठी संबंधित मंत्री महोदय व अधिकारी वर्ग यांना विनंती करेन व लवकरात लवकर महावितरण कार्यालाकडून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून विदूत पुरवठा उद्योजकांना मिळणेकरिता सहकार्य करू अशी ग्वाही दिली. तसेच महावितरणच्या ३३/११ केव्ही पंचतारांकित औद्योगिक उपकेंद्रामध्ये ३३ केव्ही चा फिडर बे व इतर पायाभूत सुविधा करिता लागणार्या निधीची तरतूद सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२०२४ अंतर्गत करणे बाबत दिनांक १९ व २० डिसेंबर २०२३ च्या होणार्या बैठकीत विषय मांडून निर्णय घेवू असे सूचित केले.
15th August
Celebrating Azadi Ka Amrut Mahotsav
Foundation ceremony of the new building of MAKH
Inauguration of ESI Clinic
ESI Blood Donation Camp
Celebrating Azadi Ka Amrut Mahotsav
Har Ghar Tiranga
Beautification of the main road
Donating a rubber boat to conduct rescue operations in flood affected areas
Vardhapan Divas of MAKH
Krutadnyata Parv
Rajarshi Shahu Smruti Shatabdi
Various Seminars & Meetings